राहुरीच्या पूर्वेकडे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई

September 19, 2022 0 Comments

https://ift.tt/UWvpsST
water issue 2

वळण : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्याच्या पूर्व भागाची जल संजीवनी असलेल्या बारागाव नांदूरसह 14 गाव योजनेची मुख्य पाईपलाईन गेल्या आठवड्यात राहुरी खुर्द व बारागाव नांदूर थडीला मुळा नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहामुळे तुटल्याने ही गावे आता ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत.  पहिली तुटलेली पाईप लाईन दुरुस्त करून पाणी पुरवठा चालू होणार तोच पुन्हा दुसर्‍या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाईप लाईन तुटल्याने आणखी पुढील दहा-बारा दिवस ही पाईप लाईन दुरुस्त करण्यास विलंब लागणार असल्याने या योजनेवर विसंबून असलेल्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात वण-वण करण्याची वेळ आली आहे. बारागाव नांदूर व इतर 14 गाव पाणी योजनेची मुख्य पाईप लाईन मुळा धरणातून बारागाव नांदूर मार्गे राहुरी खुर्द येथे मुळा नदी पात्राच्या बाजूने मांजरीपर्यंत गेली आहे.

आठवड्याभरापूर्वी मुळा नदीला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे राहुरी खुर्द येथे नदीपात्रात पाईपलाईन तुटल्याने पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. नदी पात्रातील थोडे पाणी कमी होताच युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. ते काम पूर्ण होऊन दुसर्‍या दिवशी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार होता. तोच पुन्हा राहुरी तालुक्यात व मुळा धरण पाणलोटासह लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणातून सुमारे 25 हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे ही पाईप लाईन पुन्हा राहुरी खुर्द, बारागाव नांदूर थडीला कोकाटे, ढगे वस्तीजवळ मोठ्या प्रमाणावर तुटून नादुरुस्त झाली आहे. या ठिकाणी सुमारे 30 फूट लांबीचे तीन पाईप नादुरुस्त झाल्याने आता पुन्हा ते दुरुस्त करण्यासाठी नदीपात्रातील पाणी पूर्णपणे कमी झाल्याशिवाय काम करता येणार नसल्याने पुढील किमान दहा ते पंधरा दिवस ही पाईपलाईन दुरुस्त होऊन पाणी पुरवठा पूर्व सुरू होण्यासाठी विलंब लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पाणी ओसरल्याशिवाय काम होणे अशक्य..!
मुळा नदी पात्रात कोकाटे व ढगे वस्तीजवळ मुख्य पाईपलाईनचे तीस फूट लांबीचे तीन पाईप तुटून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या दुरुस्तीसाठी नदीपात्रातील पाणी पूर्णतः कमी झाल्याशिवाय काहीच हालचाल करता येणार नाही. योजनेवरील 14 गावांच्या लाभधारकांनी परिस्थिती समजून सहकार्य करावे, असे या योजनेची देखभाल करणारे निरीक्षक शौकत इनामदार म्हणाले.

The post राहुरीच्या पूर्वेकडे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/ByqCuSF
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: