टाकळीभानकरांच्या सेवेस तत्पर: आ. निलेश लंके

September 06, 2022 0 Comments

https://ift.tt/DG8eICN
Nilesh lanke speech in Takalibhan Ahmednagar

टाकळीभान, पुढारी वृत्तसेवा: टाकळीभानकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही पारनेर विधान सभा मतदारसंघाचे आ. नीलेश लंके यांनी दिली. हजारो कोरोना बाधित रुग्णांना जीवनदान देणारे महाराष्ट्रातील लोकप्रिय आ. नीलेश लंके व युवक नेते, मुळा-प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे यांनी टाकळीभान येथे ग्रामपंचायत सदस्य मयूर पटारे व मित्र मंडळाच्या जय हनुमान तरुण गणेश मंडळाला भेट देऊन श्रीगणेशाची आरती केली. यावेळी ते बोलत होते.

आ. लंके म्हणाले, माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे वय 81 वर्षे असूनही कामाचा उत्साह कौतुकास्पद आहे. तरुणांनी हा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आ. लंके यांच्या हस्ते मंडळाचे अध्यक्ष पंकज परदेशी व उपाध्यक्ष मंगेश पटारे यांचा सत्कार झाला. ग्रामपंचायत सदस्य मयूर पटारे यांच्या निवासस्थानी आ. लंके यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आ. लंके व सिद्धार्थ मुरकुटे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच बंडू पटारे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, ‘अशोक’चे संचालक यशवंत रणनवरे, किशोर पटारे, अशोकराव पटारे, पोपटराव पटारे, शिवाजी पटारे, विजय पटारे, सुरेश पटारे, ग्रामपंचायत सदस्य सुनील बोडखे, माउली पटारे, बंडेराव तर्‍हाळ, बबलू वाघुले, कुलदीप परदेशी, अजय दुधाळे, किरण ब्राह्मणे, विकास साध्ये, अक्षय शिंदे, आदिनाथ काटे, सूरज शिंदे, शिवराज पटारे, सागर पटारे आदी उपस्थित होते.

हनुमान मंडळावर केला कौतुकाचा वर्षाव..!

टाकळीभान येथील हनुमान मंडळाने चांगले नियोजन केले. हनुमान मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवल्याबद्दल आ. नीलेश लंके यांनी मंडळावर कौतुकाचा वर्षाव केला.

The post टाकळीभानकरांच्या सेवेस तत्पर: आ. निलेश लंके appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/mNx68lM
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: