नगर : गावोगावी फॉगिंग मशीनद्वारेे फवारणी!

September 05, 2022 0 Comments

https://ift.tt/JFunMHx

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात लंपी रोगाने हाहाकार सुरू केला आहे. सव्वाशेपेक्षा अधिक जनावरे बाधित झाले आहेत, तर तीन गायींचा मृत्यू झाला आहे. दररोजचा हा आकडा वाढत असल्याने काल (दि.4) जिल्हा परिषद सीईओ आशिष येरेकर यांनी गटविकास अधिकारी यांच्यासोबत तातडीने व्हिसी घेतली. त्यात ग्रामपंचायतींनी गावातील जनावरांच्या गोठ्यात माशी, डास आणि कीटकनाशकासाठी फॉगिंग मशीनद्वारे तातडीने औषध फवारणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

गेल्या आठवड्यापासून लंपीने कहर केला आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांत लंपी रोगाने गायी व म्हशी बाधित झाल्या आहेत. काल रविवार, दि. 4 सप्टेंबरच्या एका अहवालानुसार संबंधित गावांतील 103 जनावरे लंपीने बाधित झालेली आहेत, तर या जनावरांच्या 5 किमी अंतरावरील संपर्कात असलेल्या 86 गावांमधील तब्बल 1 लाख 10 हजार 800 जनावरांना लंपीचा धोका आहे. मात्र, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर यांनी लसीकरणावर लक्ष केंद्रित केल्याने कालअखेर 63 हजार 587 जनावरांना लंपी प्रतिबंधात्मक लसीचा कवच मिळाले आहे, तर उर्वरित 50 हजार जनावरांसाठी लस दिली जात आहे.

दरम्यान, बाधित झालेल्या गायींपैकी कोर्‍हाळे (ता. राहाता), चांदेगाव (ता. राहुरी) आणि घाटशिरस (ता. पाथर्डी) या तीन तालुक्यांतील तीन गायींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्येही आता घबराट पसरली आहे.

सीईओंनी घेतला जिल्ह्याचा आढावा
लंपीची वाढती व्यापकता पाहता काल रविवारी सीईओ आशिष येरेकर व अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकार्‍यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील लंपीबाबतचा आढावा घेण्यात आला, तसेच माशी, डास आणि अन्य कीटकांपासून लंपीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी ग्रामपंचायतींनी गावात फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करावी, अशा सूचनाही सीईओंनी गटविकास अधिकार्‍यांना दिल्याचे सूत्रांकडून समजले. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांनीही लसीकरण आणि अन्य उपाययोजनांची माहिती दिली.

The post नगर : गावोगावी फॉगिंग मशीनद्वारेे फवारणी! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/nWQeZLm
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: