सावधान! जामखेडमध्ये पसरतोय लम्पी स्कीनचा धोका वाढला

September 09, 2022 0 Comments

https://ift.tt/HqsBaC5
lumpy skin disease is increasing in jamkhed Ahmednagar

जामखेड, पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात आत्तापर्यंत आठ गावांमधून लंपी स्कीन आजाराचे नमुने गोळा करून पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत. यामध्ये मोहरी, गवळवाडी, लोणी, जवळा, गुरेवाडी, पिंपळवाडी, बांधखडक, जमादारवाडी या गावांचा समावेश आहे. यापैकी मोहरी येथील नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच तालुक्यात आत्तापर्यंत सात एपी सेंटर तयार करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 26 गावांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. या सर्व गावातील जनावरांची काळजी घेण्याबाबत पशुपालकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतच्या मदतीने संबंधित गावांमध्ये कीटकनाशकांची फवारणी करण्यात आलेले आहे.

जामखेडमध्ये लंपी स्कीन डिसीज वेगाने पसरत असून जनावरांचे बाजारही बंद करण्यात आलेले आहेत. याबाबत सर्व स्तरावरून आवश्यक ते प्रयत्न करण्यात येत असून आत्तापर्यंत 11000 जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. सदर आजाराचे कोणतेही लक्षणे दिसताच पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा ग्रामपंचायतला संपर्क करावा असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.

एपिसेन्टर नुसार रेड अलर्ट गावे-

१. मोहरी- मोहरी, जायभायवाडी, गवळवाडी, गीतेवाडी
२. लोणी- लोणी, बालगव्हान, आनंदवाडी, वाकी, दरडवाडी
३. जवळा- जवळा व ग्रामपंचायत अंतर्गत सर्व वस्त्या
४. गुरेवाडी- गुरेवाडी, खूरदैठण, घोडेगाव, धोंडपारगाव
५. पिंपळवाडी- पिंपळवाडी, कोल्हेवाडी, साकत
६. बांधखडक- बांधखडक, नायगाव, नाहुली
७. जामदारवाडी- जामदारवाडी, चुंबळी, काटेवाडी, बटेवाडी, सारोळा, जामखेड शहर पूर्ण.

The post सावधान! जामखेडमध्ये पसरतोय लम्पी स्कीनचा धोका वाढला appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/p5Q2P4a
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: