मारहाण करुन चोरी करणारे आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात

September 27, 2022 0 Comments

https://ift.tt/oI5LGzE

श्रीगोंदा; पुढारी ऑनलाइन: पारगाव शिवारात रस्तालूट करणारी टोळी श्रीगोंदा पोलीस पथकाने रांजणगाव ता. शिरूर येथुन जेरबंद केली असून त्यांच्याकडून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी वसंत क्षिरसागर रा. राशिन, ता. कर्जत हे ६ ऑगस्ट रोजी शिरुर आठवडे बाजारातुन फरसाण विक्री करुन त्यांच्या मालवाहु टाटा जीप गाडीने राशिनला येत असताना पारगाव ता. श्रीगोंदा येथे चार लुटारूंनी टेम्पोला मोटार सायकल आडवी लावुन टेम्पोतील लोकांना मारहाण करून खिशातील पैसे, मोबाईल बळजबरीने काढुन घेतले होते. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रस्तालूट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास चालु असताना पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना रांजणगाव येथील आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार श्रीगोंदा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सचिन बाळासाहेब कोल्हे रा.विट, ता. करमाळा, आप्पासाहेब काशीनाथ सोलंकर रा. करपडी, राशिन, ता. कर्जत ह. रा. कारेगाव ता. शिरुर, चेतन साहेबराव सांगळे रा. करंजी ता. पाथर्डी ह. रा. कारेगाव ता. शिरुर, सोनल साहेबराव चव्हाण वर्षे रा. गवखेल ता. आष्टी जि. बीड ह. रा. कारेगाव ता. शिरुर यांना कारेगाव येथुन ताब्यात घेतले. संशयितांकडे कसुन चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली.

आरोपीकडून मोबाईल आणि दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मा. आण्णासाहेब जाधव आणि पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करीत आहेत. ही कारवाई श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोसई समीर अभंग, पोसई प्रदिप बो-हाडे, सहायक फौजदार अंकुश ढवळे (SDPOकार्या), पोना गोकुळ इंगवले, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ दादासाहेब टाके, पोकॉ अमोल कोतकर, पोकॉ रविंद्र जाधव, पोकॉ प्रशांत राठोड यांनी केली आहे.

The post मारहाण करुन चोरी करणारे आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/jzRZ7gx
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: