संगमनेर नगरपालिकेच्या दोन अभियंत्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

September 17, 2022 0 Comments

https://ift.tt/2xpthsA

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा: शहरातील हिंदू धर्मिय स्मशानभूमी सुशोभीकरणांच्या निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वी नगरपरिषदेच्या नगरअभियंत्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणीचा अहवाल सादर करणे अपेक्षित असताना थेट निविदा काढून नगरपरिषद आणि शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला असल्याचा ठपका ठेवत नगरपरिषदेचे नगर अभियंता राजेंद्र सुतावणे व कनिष्ठ अभियंता सूर्यकांत गवळी या दोघा अभियंत्यांवर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नगरपरिषदेच्या माध्यमातून हिंदु धर्मियांच्या स्मशानभूमीचे सुशोभिकरण व नुतनीकरणाचे काम 2019 मध्ये झालेले असतांनाही त्याच कामासाठी दोन, तीन टप्यात सुमारे 33 लाख रुपयांच्या दोन स्वतंत्र निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र काम झालेले असतानाही पुन्हा निविदा काढून या स्मशानभूमीच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचा ठपका ठेवत भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी आंदोलन करून या विषयाचा पाठपुरावा केला. शहर पोलीस ठाण्यात आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणाबाबतची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करिता जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी श्रीरामपूर नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना वरील प्रकरणाबाबत सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिंदे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल जिल्हाधिकारी डॉ भोसले यांना सादर केला होता. त्यातून राजेंद्र सुतावणे आणि सूर्यकांत गवळी या दोघांचा या प्रकरणात हेतू स्पष्टपणे समोर आला.

नगरपालिकेच्या या दोन अधिकाऱ्यांनी संगनमत करुन स्थळ पाहणी अहवाल सादर न करताच थेट निविदा काढत शासनाचीच फसवणूक केली असल्याचे उघड झाले असून याबाबत श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील दोघा अभियंत्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

The post संगमनेर नगरपालिकेच्या दोन अभियंत्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/vMlN4SH
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: