नेवासा : कपाशीवर अज्ञातांनी फवारले तणनाशक, शेतकर्‍यांचे मोठे नुकसान

September 19, 2022 0 Comments

https://ift.tt/csA59Uv

नेवासा : पुढारी वृत्तसेवा  : नेवासा तालुक्यातील पाचेगाव ते पाचेगाव फाटा या रस्त्यावर फाट्या जवळ रस्त्यालगत असणार्‍या चार एकर क्षेत्रावरील कपाशी पिकावर अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारणी करून शेतकर्‍याचे मोठे नुकसान केले. याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील पाचेगाव फाट्याजवळ व रस्त्यालगत असणार्‍या गट नं. 32/1 हरीबभाई शेख (रा.श्रीरामपूर) यांच्या मालकीची साडे आठ एकर जमीन आहे. त्यांचे भाचे शकील वहिद भैलीमकर (शेंदूरवाले) (रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर) यांनी यातील चार एकर क्षेत्रात कपाशी केली आहे. कपाशीचे पीक देखील चांगले आले होते. पण अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी (दि. 16) रात्री संपूर्ण कपाशी क्षेत्रावर तणनाशकाची फवारणी केली. त्यामुळे या कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

या क्षेत्रात शनिवारी चक्कर मारण्यासाठी गेल्यानंतर कपाशीची झाडे पूर्णतः कोमेजलेल्या व वाळलेल्या अवस्थेत पहायला मिळाली. त्यानंतर आम्ही टाकळीभान येथील कृषी केंद्रातील मित्रांना ही बाब सांगितली. त्यांनी संगमनेर येथून काही कृषी तज्ञास बोलविले. तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन कपाशी क्षेत्राची पाहणी केल्यानंतर या कपाशी पिकांवर तणनाशक फवारणी झाल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर रविवारी सकाळी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात व्यक्तीवर आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

 

हे क्षेत्र आमच्या मामाचे असून ते आम्ही करतो. आमचा कोणाशीही वाद नाही. चार एकर कपाशी एकदम चांगल्या अवस्थेत होती. चांगले पाते लागून काही झाडांना कैर्‍या देखील लागल्या होत्या. आम्ही टाकळीभान येथून ये-जा करून शेती करतो. पण या कृत्यामुळे आम्ही पूर्ण खचलो आहोत. या प्रकरणाचा तपास होऊन न्याय द्यावा.
– शकील भैलीमकर, शेतकरी, टाकळीभान

The post नेवासा : कपाशीवर अज्ञातांनी फवारले तणनाशक, शेतकर्‍यांचे मोठे नुकसान appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/tMqmK16
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: