पाथर्डी: बालवे वस्तीवरील मातीचा पूल गेला वाहून, रस्ता दुरुस्तची मागणी

September 20, 2022 0 Comments

https://ift.tt/GrfLZYX
balave vasti bridge damaged in heavy rain in pathardi ahmednagar

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा: शहरातील बालवे वस्ती परिसरातील नदीवरील मातीचा भरव टाकून केलेला पूल पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला. यामुळे एका वस्तीवरून दुसर्‍या वस्तीवर शाळेत ये-जा करणार्‍या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. वाहून गेलेला रस्ता तत्काळ दुरुस्त करा, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक आयुब सय्यद यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र बोरूडे, सोमनाथ बोरूडे, मराठा सेवा संघाच्या शहर अध्यक्ष आप्पासाहेब बोरूडे, बाळासाहेब बालवे, युवा नेते संदीप बालवे, उमेश साखरे आदी उपस्थित होते.

गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने नदीवरील कच्च्या पूल वाहून गेल्याने रस्ता बंद झाला आहे. खंडोबा माळ प्राथमिक शाळा व आदर्श माध्यमिक विद्यालयातील 20 ते 25 विद्यार्थी शाळेकडे येणारा रस्ता बंद झाल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना पर्याय मार्ग म्हणून चांदगाव रोड ते राष्ट्रीय महामार्ग असल्याने विद्यार्थ्यांना या मार्गामुळे धोका असल्याने भविष्यात काही प्रकार घडल्यास याची जबाबदारी शासनावर राहील, असे निवेदनात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबवावी, अन्यथा नगरपरिषद विरोधात कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनसह आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

The post पाथर्डी: बालवे वस्तीवरील मातीचा पूल गेला वाहून, रस्ता दुरुस्तची मागणी appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/O7W4CE9
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: