नगर : ‘नागेबाबा’त पुन्हा नकली सोने! एकूण 6.83 किलो बनावट सोने

September 28, 2022 0 Comments

https://ift.tt/1f5cAld

नगर : पुढारी वृत्तसेवा  : श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीमध्ये मंगळवारी (दि.27) झालेल्या तपासणीत आणखी 14 खात्यांमध्ये 230 तोळे बनावट सोने आढळून आले आहे. नागेबाबा सोसायटीतील फसवणुकीचा आकडा 2.29 कोटींच्या घरात गेला असून, आतापर्यंत 6836 ग्रॅम म्हणजेच पावणेसात किलो बनावट सोने असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांना संशय असलेल्या आणखी काही खात्यांची तपासणी सुरू असून, फसवणुकीचा आकडा वाढणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
बनावट सोनेतारण प्रकरणी रविवारी अटक केलेल्या सचिन लहानबा जाधव (रा. निमगाव वाघा, ता. नगर) याच्या खात्यात 10.83 लाखांचे सुमारे 32 तोळे बनावट सोने आढळून आले होते.

मंगळवारी झालेल्या तपासणीत नागेबाबाच्या 14 खात्यांमध्ये 81 लाख 11 हजार रूपये किंमतीचे 230 तोळे बनावट सोने आढळून आले आहे. नागेबाबाच्या बनावट सोनेतारण गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता 42 वर जाऊन पोहोचली आहे. शहर सहकारी बँकेतील आरोपीच नागेबाबाच्या प्रकरणात आरोपी आहे. गुन्ह्याचा तपास कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.

आरोपींना न्यायालयीन कोठडी
अजय किशोर कपाले, सुनिल ज्ञानेश्वर अळकुटे, श्रीतेश रमेश पानपाटील, संदीप सिताराम कदम, सचिन लहानबा जाधव या पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मंगळवारी संत नागेबाबा पतसंस्थेची 14 खाती तपासण्यात आली. त्यामध्ये 81 लाख 11 हजार रूपये किंमतीचे 2385 गॅ्रम बनावट सोने आढळून आले आहे.
                                                 -गजेंद्र इंगळे, पोलिस उपनिरीक्षक, कोतवाली

The post नगर : ‘नागेबाबा’त पुन्हा नकली सोने! एकूण 6.83 किलो बनावट सोने appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/4ULhO5F
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: