नगर : 105 गावांना लंपीचा विळखा; 17 मृत्यू

September 15, 2022 0 Comments

https://ift.tt/slFUau7

नगर : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांच्या पशुधनावर नैसर्गिक आपत्ती म्हणून आलेल्या लंपीने आता जणू जिल्हा व्यापला आहे. जिल्ह्यातील 105 गावांत 454 जनावरे बाधित असून, पाच कि.मी. अंतरावरील तब्बल 561 गावे लंपी सदृश आजाराच्या भितीखाली आहे. पशुसंवर्धन विभागाने या गावांतील तीन लाख जनावरांना लसीकरण केले असून, 217 जनावरे लंपीतून सुखरूप बाहेर पडले आहेत.
जिल्ह्यात लंपी आजाराने पशुधन संकटात सापडले आहे. दररोज बाधितांचा आकडा वाढताच आहे.

त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने ‘मिशन’ म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरण आणि औषधोपचारही सुरू केले आहेत. सीईओ आशिष येरेकर, अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे हे तालुकानिहाय दौरे करत असून, प्रशासनाला आवश्यक त्या सूचना करत आहेत. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर यांनी आजारी जनावरांवर उपचारास प्राधान्य दिले आहे. तसेच, लसीकरणालाही वेग दिला आहे. काल बुधवारी सायंकाळच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील 105 गावे आता बाधित झाले आहेत. यातील 454 जनावरे आजारी आहेत.

यापैकी 217 जनावरे बरी झाल्याची दिलासादायक माहिती असून, आतापर्यंत 17 जनावरे मृत झाल्याने चिंतेचे ढग कायम आहेत. बाधित जनावरे आढळलेल्या पाच किमी अंतरावर आता 561 गावे आहेत. या गावांमध्ये 6 लाख 13 हजार 349 जनावरांना लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने लस पुरवठा केला आहेच, शिवाय जिल्हा परिषदेनेही सेस फंडातून 50 हजार डोस उपलब्ध केले आहेत. तसेच राजहंस, बारामती अ‍ॅग्रो आदी संस्थांनीही आपल्या स्तरावरून लस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत 2 लाख 13 हजार 349 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

औषध बँका; राज्यासाठी दिशादर्शक उपक्रम!
जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांच्या ठिकाणी ‘औषध बँक’ उभारली जाणार आहे. शासन स्तरावरून जनावरांची औषधे उपलब्ध होतातच. मात्र, कधी जनावरे गंभीर अवस्थेत असली, तर त्यांच्यासाठी अत्यावश्यक व महागडी औषधे गरजेची असतात. परंतु, अशावेळी या औषधांसाठी शेतकर्‍यांची मोठी परवड होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून प्रत्येक पंचायत समितीच्या ठिकाणी औषध बँक उभारून त्यात ‘त्या’ औषधांचा साठा ठेवला जाणार आहे. याकामी अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याने दोन दिवसांतच बहुतांशी तालुक्यात औषध बँका सुरू झाल्या आहेत. हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरणारा आहे.

 

The post नगर : 105 गावांना लंपीचा विळखा; 17 मृत्यू appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/ELS1i3p
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: