कर्जत : जि. प. शाळांमध्ये कोडिंग लॅब उभारणी: आ.रोहित पवारांनी घेतला पुढाकार

August 15, 2022 0 Comments

https://ift.tt/FR0xMeH

कर्जत; पुढारी वृत्तसेवा: कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन आणि अ‍ॅमेझॉन इंडिया यांच्या वतीने कर्जत व जामखेड तालुक्यातील आठवीपर्यंत शाळांमध्ये कोडिंग लॅबची उभारणी करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या संगणकीय भाषा शिकविण्यात येणार आहेत. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून या कोडिंग लॅबची उभारणी होत आहे.
कोडिंग लॅब उभारण्यात येणार्‍या कर्जत तालुक्यातील देशमुखवाडी, मिरजगाव व बाभूळगाव खालसा आणि जामखेड तालुक्यातील चौंडी, सारोळा आणि जामखेड शहरातील उर्दु शाळा आणि सारोळा येथील शाळांना आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांना राखीही बांधण्यात आली.

जिल्हा परिषद शाळेतील प्रामुख्याने सहावी ते आठवीचे विद्यार्थी, तसेच शिक्षकांना या लॅबचा मोठा फायदा होणार आहे. निवडण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये उभारण्यात येणार्‍या अमेझॉन कोडिंग लॅबमध्ये प्रत्येक शाळेला 8 कॉम्प्युटर सिस्टीम देण्यात येणार आहे. तसेच, दोन्ही तालुक्यात कोडिंगमध्ये निपुण असलेल्या प्रशिक्षकाचीही नेमणूक करण्यात येणार आहे. या लॅबमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना सी, सी प्लस, जावा आदी संगणकीय भाषा शिकविण्यात येतील. कोडिंग लॅबच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील संगणकाविषयीची भीती दूर होऊन त्यांना ज्ञान मिळेलच.

शिवाय, विविध संगणकीय भाषांमुळे सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग, गेमिंग, निमेशन यासारख्या क्षेत्रांमध्ये त्यांना भविष्यात नवनवीन संधी मिळतील.या शाळेत इतर शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकही येऊन प्रशिक्षण घेऊ शकतील. त्यामुळे या उपक्रमाचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शाळांना होणार आहे. यामध्ये शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने ते विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करू शकतील.

 

The post कर्जत : जि. प. शाळांमध्ये कोडिंग लॅब उभारणी: आ.रोहित पवारांनी घेतला पुढाकार appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/NLE9UuR
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: