नगर :  मोहरम विसर्जन मिरवणूक शांततेत

August 10, 2022 0 Comments

https://ift.tt/MItAOpk

नगर :  पुढारी वृत्तसेवा : राज्यात प्रसिद्ध असलेल्या मोहरमनिमित्त काढण्यात आलेली ‘कत्तलची रात्र’ मिरवणूक सोमवारी शांततेत पार पडली. तसेच, मंगळवारी (दि.9) शहरातून मोहरम विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला कोठला येथून सुरुवात झाली. तर, सावेडी गावात विसर्जन शांततेत पार पडले. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही ढोल-ताशांच्या गजरात भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे मोहरम मिरवणुकीवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे मोहरम मिरवणूक काढण्यात आली नव्हती. दरम्यान, यावर्षी निर्बंधमुक्त वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे मोठी भाविकांची गर्दी जमली होती. दिवसभर पावसाची रिपरिप असतानादेखील भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. तसेच, मोहरम मिरवणूक मार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

छोटे बारा इमाम यांची सवारी मंगलगेट या ठिकाणी आली असता, मोठे बारा इमाम यांची सवारी पारंपरिक पद्धतीने उठविण्यात आली. शहरातून छोटे बारा इमाम यांची मिरवणूक काढण्यात आली. मोहरम विसर्जन मिरवणुकीला दुपारी 12.30 वाजता शहरातील कोठला येथून सुरुवात झाली. मिरवणुकीदरम्यान ‘या हुसेन, या हुसेन’ अशा घोषणा दिल्यात होत्या. सरबताचे वाटप करत मिरवणूक शहरातून मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली.

मिरवणूक मार्गात पोलिसांचा बंदोबस्त
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, 5 पोलिस उपअधीक्षक, 19 पोलिस निरीक्षक, 29 सहायक पोलिस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली 550 पोलिस कर्मचारी, 400 होमगार्ड मिरवणूक मार्गात तैनात करण्यात आले होते, तसेच राज्य राखीव दलाची एक तुकडी, आरसीपीची तीन पथके, एसटीआरची आठ पथके व धडक कृती दलाचे एक पथक पोेलिसांच्या मदतीसाठी होते.

विसर्जन मिरवणूक अशी झाली मार्गस्थ
कोठला येथून छोटे इमाम हुसेन सवारी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी कोठला परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती, तर दुपारनंतर मंगलगेट हवेली येथून दुपारनंतर मोठे इमाम हसन यांची सवारी मार्गस्थ झाली. विसर्जन मिरवणूक दाळमंडई, पंचपीर चावडी, पीरशहा खुंट, बांबूगल्ली, जुनी महापालिका इमारत, कोर्ट गल्ली, दिल्ली गेट, बालिकाश्रम रोडमार्गे मिरवणूक जाऊन पुढे सावेडी गावात रात्री सवार्‍यांचे विसर्जन शांततेत पार पडले.

सवारींभोवती पोलिसांचा बंदोबस्त
कोठला येथून छोटे इमाम हुसेन सवारी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर चादर चढविण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मिरवणूक मार्गात सवारींभोवती पोलिसांचा विशेष बंदोबस्त होता.

The post नगर :  मोहरम विसर्जन मिरवणूक शांततेत appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/XNlqwRG
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: