खड्डे चुकविताना तरुणाचा अपघात, करंजी येथील घटना

August 04, 2022 0 Comments

https://ift.tt/ctbwfxE
अपघात

करंजी :  पुढारी वृत्तसेवा : शेवगाव येथील एक तरुण पुणे येथून स्पर्धा परीक्षा देऊन शेवगाव कडे येत असताना मंगळवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्याचा करंजी गावाजवळ महामार्गावरील खड्डे चुकविताना अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे.
अपघातानंतर जखमी अशितोष जोशी (राहणार शेवगाव) हा तरुण बराच वेळ महामार्गावर पडलेला होता.

काही वेळाने देवराई व तिसगाव येथील युवक नगरहून तिसगावकडे जात असताना त्यांनी या मोटारसायकल स्वराचा अपघात झाले पाहिले. त्यानंतर लगेच त्याला पुढील उपचारासाठी अंकुश पालवे, शुभम मेहेर, अक्षय हवाले, सोमनाथ करूद, अविनाश काळे, प्रशांत कांबळे यांनी मदत करत त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर जांब कौडगाव, करंजी, देवराई, तिसगाव, निवडुंगे या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून या खड्डयांमुळे दररोज अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत.

त्यामुळे या महामार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद मरकड, छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मोरे, चेअरमन बाळासाहेब लवांडे, व्हाईस चेअरमन अरिफ तांबोळी, उपसरपंच इलियास शेख, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष अनिल रांधवणे, युवानेते पंकज मगर यांनी केली आहे.

The post खड्डे चुकविताना तरुणाचा अपघात, करंजी येथील घटना appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/chBD8jr
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: