करजगावात तरुणांवर तलवारीने केले वार

August 13, 2022 0 Comments

https://ift.tt/Ism4x6N

सोनई : पुढारी वृत्तसेवा :  करजगाव येथे किरकोळ कारणाने झालेल्या वादातून अनिल योसेफ गायकवाड यांच्यावर अर्जुन भास्कर गायकवाड याने तलवारीने वार केल्याची थरारक घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेत अनिल गायकवाड हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

यात अनिल गायकवाड याचा भाऊ बापू योसेफ गायकवाड यांच्या हातालाही तलवार लागल्यामुळे तोही जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती सोनई पोलिस ठाण्यात समजतास पोलिस नाईक विशाल थोरात यांनी घटनास्थळावरून अर्जुन गायकवाड यास ताब्यात घेतले आहे. जखमींचा जबाब घेण्याकरिता पोलिस पथक गेले असून, रात्री गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

The post करजगावात तरुणांवर तलवारीने केले वार appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/IW53hRi
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: