नगर : क्लासवरून घराकडे जाणार्‍या मुलीची छेड

August 07, 2022 0 Comments

https://ift.tt/kMnS90H

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील महात्मा गांधी रसत्यावरून शिवणक्लास झाल्यानंतर घरी जाणार्‍या तरूणीची वाटेत अडवून एका अनोळखी तरूणाने छेड काढल्याचा प्रकार घडला. अनोळखी तरूणाविरूद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरूणीने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. क्लासवरून घरी जात असताना लालटाकी परिसरात एक अनोळखी तरूण पाठलाग करत असल्याचे तिच्या लक्षात आले.

तसेच, रिक्षाने घरी जात असताना सदर तरूणाने मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचे लक्षात आल्यानंतर या मुलीने त्याला ‘कोण रे तू, माझी शुटींग काढतो का’, अशी विचारणा केली. त्यानंतर तो गडबडून गेला. त्याच्या हातातील मोबाईल खाली पडला व मोबाईल न उचलताच तो तेथून निघून गेला. या प्रकारानंतर मुलीने घरी जाऊन आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिने तोफखाना पोलिस ठाण्यात अनोळखी तरूणाविरूद्ध तक्रार दिली. तसेच, त्याचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी अनोळखी तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

The post नगर : क्लासवरून घराकडे जाणार्‍या मुलीची छेड appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/1YNRxLM
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: