कर्जत : जातीय तणाव नव्हे; दोन तरूणांच्या वैयक्तिक भांडणातून ‘तो’ प्रकार

August 07, 2022 0 Comments

https://ift.tt/Ng0emWH

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत शहरात कोणताही जातीय तणाव नसून हाणामारीचा प्रकार दोन तरुणांमधील भांडणातून घडलेला आहे. बाहेरच्या शक्ती जातीय तेढ निर्माण करणारी परिस्थिती निर्माण करत असून, कर्जत शहरातील नागरिक ते खपवून घेणार नाहीत. वाद समोपचाराने मिटविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, बाहेरच्यांनी यात लक्ष घालून वातावरण बिघडवू नये, असे आवाहन सर्वसमावेशक व्यापारी, राजकीय पदाधिकारी व नागरिकांच्या बैठकीत करण्यात आले.

कर्जत ग्रामदैवत संत गोदड महाराजाची भूमि आहे. आतापर्यंत कधीही जातीय वाद झालेला नाही. दोन तरुणांमधील भांडणाचा संदर्भ असलेल्या घटनेला जाणून-बुजून जातीय रंग दिला जात आहे. ते योग्य नाही. कोणतीही घटना घडली की, कर्जत बंद करणे योग्य नाही. काल शहरात अचानक पुकारलेला बंद व्यापार्‍यांना मान्य नाही. अचानक पुकारलेल्या बंदमुळे अनेक व्यवसायिकांचे नुकसान झाल्याचे व्यापारी असोसिएशचे सचिव बिभीषण खोसे यांनी निदर्शनास आणून दिले. नामदेव राऊत यांनी वाद पंच कमिटी करून मिटवू असे म्हणत पुन्हा बैठक घेण्याचे स्पष्ट केले.

प्रवीण घुले यांनी शहरात तणाव नसताना वृत्तवाहिन्या बातम्या देत असल्याचे सांगितले. सनी पवार यास झालेल्या मारहाणप्रकरणी बाहेरचे लोक उलट सुलट प्रतिक्रिया देऊन कर्जतला मोठा गुन्हा घडल्यासारखे वार्तांकन करत असून, ते योग्य नाही. मुंबईत बसून कोणीही प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन करण्यात आले. बैठकीस दीपक शिंदे, सुनील शेलार, संतोष म्हेत्रे, रज्जाक झारेकरी, संजय भैलूमे, बिभीषण खोसे, भास्कर भैलूमे, प्रसाद शहा, अनिल भैलूमे, अभय बोरा, सतीश पाटील, नामदेव राऊत, प्रवीण घुले, अंबादास पिसाळ यांनी मनोगते व्यक्त केले. या बैठकीस अर्जुन भोज, संजय काकडे, समशेर शेख, शब्बीर पठाण, सचिन कुलथे, सचिन घुले, भाऊसाहेब तोरडमल, अ‍ॅड. अशोक कोठारी, महावीर बोरा, किरण भैलूमे, संतोष भैलूमे, संजय भिसे, दत्तात्रय कदम, राजू बागवान आदी उपस्थित होते.

हल्लाप्रकरणात सहा जणांना अटक
सनी पवार या युवकास काही मुलांच्या टोळक्याने जबर मारहाण केली होती. यामधील दोन आरोपी सोहेल शौकत पठाण, अरबाज कासम पठाण (दोघे रा. लोहारगल्ली) यांना कर्जत पोलिसांनी अटक केली. आरोपींना उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 10 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जुनेद जावेद पठाण आणि एक अल्पवयीन यांना पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेतले असून, त्यांना मदत करणारे हुसेन कासम शेख, अरबाज अजित शेख यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

The post कर्जत : जातीय तणाव नव्हे; दोन तरूणांच्या वैयक्तिक भांडणातून ‘तो’ प्रकार appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/9etRpZU
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: