नगर : रस्ता खोदल्याने विद्यार्थ्यांची शाळा बंद!

August 01, 2022 0 Comments

https://ift.tt/eIFST8Z

राशीन, पुढारी वृत्तसेवा : राशीन येथील प्रभाग क्रमांक 2 मधील राज्य महामार्ग 68 लगत असणार्‍या सरोदेवस्तीवरून जाणारा रस्ता राऊतवस्ती, मोढळेवस्ती, मोहिते वस्ती, तांबे-दनावले वस्तीवरून चौकीचा लिंब या ठिकाणी भिगवण रस्त्याला मिळतो. या रस्त्याचा राशीनला दळणवळणासाठी उपयोग होतो. मात्र, या रस्त्याच्या कडेच्या शेतकर्‍याने आमच्या शेतातून रस्त्ता जातो, या कारणावरून रस्ता खोदून त्यावर झाडे लावली आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास, तर सहन करावा लागत आहेत.

रस्ता बंद झाल्याने मागील 10 ते 12 दिवसांपासून मुले शाळेत देखील जाऊ शकले नाहीत. मुलांना शाळा बंद करण्याची वेळ रस्ता बंद झाल्यामुळे आली आहे. यास जबाबदार कोन असा संतप्त सवाल विद्यार्थी, पालक करीत आहेत. या संदर्भात स्थानिक पातळीवर चर्चा करूनही पर्याय निघत नाही. या वस्त्यावरील नागरिकांना कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्याकडे रस्ता खुला व्हावा, या संदर्भात पत्रव्यवहार केला आहे. सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला नाही झाल्यास 2 ऑगस्ट रोजी हे सर्व नागरिक दौंड-उस्मानाबाद रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर संतोष सरोदे, महादेव राऊत, सुरेश मोहिते, सुनील राऊत, राम कानगुडे, लक्ष्मण राजेभोसले, माउली सायकर, नितीन सरोदे, संजय मोहिते, सुधीर राऊत, भाऊ मोहिते, मिलिंद राऊत यांच्यासह पाचशे तीस नागरिकांच्या सह्या आहेत.

मातोश्री पाणंद रस्ता योजनेतून काम मंजूर

विशेष म्हणजे हा रस्ता मातोश्री पाणंद योजनेंतर्गत मंजूर झाला असून, या रस्त्याच्या कामाकरिता सरोदे वस्ती ते मोढळे वस्ती, मोहिते वस्ती, राऊतवस्ती या करिता 3 लाख 6 हजार रुपयांचा निधी देखील मंजूर झाला आहे. आता शेतकर्‍याने रस्ताच अडविला आहे. त्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

The post नगर : रस्ता खोदल्याने विद्यार्थ्यांची शाळा बंद! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/Mk0ailV
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: