नगर : तिरंगाची सक्ती नको, प्रोत्साहन द्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला निर्देश

August 13, 2022 0 Comments

https://ift.tt/6saYFS1

नगर : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात घरोघरी तिरंगा हा उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयं:प्रेरणेने तिरंगा ध्वज आपापल्या घरावर फडकवावा. यासाठी जनतेला सक्ती न करता घरावर तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहित करा, असे निर्देश राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

दरम्यान, मंत्री विखे पाटील 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांशी बातचीत करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या पूर्वतयारी आणि नियोजन या संदर्भात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रशासनातील अधिकार्‍यांशी संवाद साधतांना मंत्री विखे पाटील बोलत होते.

स्वराज्य अभियान, घरोघरी तिरंगा अशा विविध उपक्रमांध्ये लोकसहभाग महत्त्वाचा असून, सर्व घटकातील लोकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकार्‍यांनी विशेष प्रयत्न करावेत. या उपक्रमात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला बचत गट, विविध संस्था, उद्योग, सर्व राजकीय पक्ष यांनी सुद्धा सहभागी होणे अपेक्षित आहे. हा शासकीय उपक्रम नसून, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. हा उपक्रम सर्वांच्या सहकार्यानेच यशस्वी होईल, अशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

The post नगर : तिरंगाची सक्ती नको, प्रोत्साहन द्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला निर्देश appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/XIsvh0a
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: