चिंता मिटली ! बलठण ओव्हर फ्लो !

July 14, 2022 0 Comments

https://ift.tt/WQs5TL2

अकोले : पुढारी वृत्तसेवा : मुळा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसाने बलठण धरण आज बुधवारी ओव्हर फ्लो झाले. मुळा धरणाचा पाणीसाठा 44.37 टक्के झाला आहे. मुळा परिसरात पाऊस असल्याने शिरपुजे, आंबित, कोथळे धरणे भरले आहेत. बलठण येथील 202 दशलक्ष घनफूट क्षमतेचा लघुपाटबंधारे तलाव भरून वाहू लागला आहे.

तर भात लावणीचे काम जोरात सुरू आहे. भंडारदरा धरणात 5968 (54 टक्के) दशलक्ष घनफुटावर पोहचला आहे.असून धरणातून वीजनिर्मितीसाठी 845 क्युसेकने पाणी सोडण्यास आले आहे. वाकी येथील तलावाच्या भिंतीवरून 789 क्युसेकने पाणी नदीपात्रात पडत आहे. निळवंडे जलाशयातील पाणीसाठा 4989 दशलक्ष घनफुट साठा झाला आहे.आढळा 861 दशलक्ष घनफुट साठा झाला आहे.

12 तासात 132 दशलक्ष घनफूट नवे पाणी
पावसाचे आगार समजल्या जाणार्‍या घाटघर व रतनवाडी, साम्रद, उडदावणे पाऊस टिकून आहे. भंडारदरा धरणाचा आजचा पाणी साठा 5968 दशलक्ष घनफुटावर पोहचला असुन गेल्या 12 तासात 132 दशलक्ष घनफुट नवीन पाण्याची आवक झाली आहे. आतापर्यंत रतनवाडी 93 मि.मी (एकूण 2015 मि.मीटर), भंडारदरा 75 मि.मी. (1239 मि.मीटर), घाटघर 115 मि.मीटर(एकुण 1874 मि.मीटर), वाकी 41 मि.मी (909 मि.मीटर) पावसाची नोंद पाटबंधारे विभागाकडे झाली आहे.

The post चिंता मिटली ! बलठण ओव्हर फ्लो ! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/A6zwBmJ
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: