पिस्तुल परवान्याची मागणी करणारे कार्यकारी अभियंता तीस हजार घेताना “लाचलुचपत”च्या जाळ्यात

June 23, 2022 0 Comments

बीड – नियोजन समिती अंतर्गत केलेल्या कामाची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच घेताना अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले. त्यांच्याच कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान बोगस देयके काढण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत याच संजयकुमार कोकणे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पिस्तुल परवान्याची रितसर मागणी केली होती. 

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांना बुधवारी लाच घेताना पकडले. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधीतून केलेल्या कामाची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी कोकणे यांनी तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पडताळणी करण्यात आली. बुधवारी दुपारी संजयकुमार कोकणे यास तक्रारदाराकडून तीस हजार रुपयांची लाच घेताना त्यांच्याच कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. दरम्यान कोकणे यांनी अंबाजोगाईच्या कार्यकारी अभियंता पदाचा पदभार घेताच जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार केली होती. बोगस कामे आणि त्यांच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात अशी तक्रार कोकणे यांनी केली होती. जीवाला धोका असल्याचा उल्लेख करत कोकणे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पिस्तुल परवाना देण्याची मागणीही केली होती. स्वतः अधिकार्‍यानेच पिस्तुल परवाना मागितल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. आता त्याच कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणेंना लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने प्रशासकीय वर्तूळात खळबळ उडाली.



https://ift.tt/SiGNc4p

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: