बुलढाणा जिल्हा परिषदेचे आठ गट वाढले; प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध

June 03, 2022 0 Comments

बुलढाणा जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्याच्या प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आज प्रसिद्ध केली. जिल्हा परिषदेचे आठ गट व पंचायत समित्यांचे १६ गण वाढले आहेत.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील विविध कलमान्वये जिल्हा परिषद व १३ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम निवडणूक विभागाला प्राप्त झाला. त्यानुसार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या प्रारूप रचनेची प्रसिद्धी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना कार्यक्रमानुसार सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास ३१ मे रोजी विभागीय आयुक्तांकडून मान्यता मिळालेली आहे. या प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना २ जुन रोजी प्रसिद्ध करण्यात आली.

या प्रारूप प्रभाग रचनेवर ज्या नागरिकांना सुचना व हरकती दाखल करावयाच्या असल्यास त्यांनी ८ जुनपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी देऊन निवडणूक विभाग २२ जुनपर्यंत गण रचना अंतिम करणार आहे. अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात २७ जुन रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेचे सदस्य संख्या आता ६० वरून ६८ झाली. पंचायत समित्यांची गणांची संख्या १२० वरून १३६ झाली आहे. वाढलेल्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन जागांमध्ये ही वाढ झाली आहे.

https://ift.tt/VgHdvsr

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: