पंजाब मिळवल्यानंतर देशभरात सत्तास्थापनेसाठी आप आता या लोकांवर बोली लावतंय

April 08, 2022 , 0 Comments

पंजाबमध्ये आपचा दणाणून विजय झाला. इतका की अजूनही त्याच वारं शांत होण्याचं नाव घेईना. आजपर्यंत पंजाब बीजेपीचा बालेकिल्ला होता मात्र तो आपने ‘भगवंत मान’ नावाचं कार्ड सोडत हासील केला. साधा कॉमेडियन जेव्हा योग्य धोरणासाठीत सत्तेत उतरतो तेव्हा तो काय करू शकतो, याच उदाहरण भगवंत मान यांनी सेट केलं.

एखाद्या आम आदमीला जेव्हा उमेदवार केलं जात तेव्हा त्याचा जास्त इम्पॅक्ट होतो, हे तंतोतंत हेरत पक्षाने तशीच निवड सध्या सुरु केल्याचं दिसतंय. म्हणून तर भगवंत मान यांच्या यशानंतर आता देशपातळीवर सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने जेव्हा पक्षाने वाटचाल सुरू केली आहे, तेव्हा असाच काही आम आदमींवर सध्या पक्षाने विश्वास टाकल्याचं दिसतंय.

यामध्ये अगदी आयआयटीच्या प्राध्यापकापासून ते कम्प्युटर इंजिनिअर्स यांचा समावेश आहे. जवळपास अशा १० जणांची जणांना एका वेगवेगळ्या राज्यांसाठी पक्षाने लॉन्च केलं आहे संबंधित राज्यात पक्षाच्या स्थापनेची जबाबदारी दिली आहे. म्हणूनच कोण आहेत ही दहा माणसं बघूया…

१. दुर्गेश पाठक

३१ वर्षांचे पाठक हे ‘आप’चे सर्वात तरुण राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत. हिमाचल प्रदेशची धुरा देण्यात आली आहे. कारण पाठक हे केजरीवाल यांचे डोळे आणि कान म्हणून संपूर्ण पक्षात ओळखले जातात. ते पक्षाच्या संयोजकांच्या सर्वात जवळच्या सहाय्यकांपैकी एक तर आहेतच मात्र पक्षाच्या राष्ट्रीय विस्तार योजनेचा देखील एक महत्त्वपूर्ण भाग ते आहेत. अगदी पंजाबच्या निवडणुकीपूर्वीपासून.

२०११ च्या अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील इंडिया अगेन्स्ट करप्शन चळवळीत ते सहभागी होते. २०१२ मध्ये आपच्या स्थापनेत त्यांनी भूमिका बजावली होती. प्रमुख धोरणकार म्हणून ते कार्यरत होते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते आपच्या पंजाब प्रचाराचे प्रमुख होते. यावर्षी, ते गोवा निवडणुकीचे प्रभारी होते. शिवाय पाठक हे ‘आप’चे प्रवक्ते आणि महापालिका कामकाज प्रभारी देखील आहेत.

२. सौरभ भारद्वाज

व्यवसायाने कम्प्युटर इंजिनिअर असलेले ४२ वर्षीय भारद्वाज दिल्लीतील ग्रेटर कैलास मतदारसंघातून तिसऱ्यांदा आपचे आमदार झाले आहेत. काही महत्त्वाच्या पक्ष मोहिमांमध्ये ते आघाडीवर होते, जसे की आपची हिंदू ओळख दाखवण्याची रणनीती जी आता भाजप स्वतःच्या खेळात घेण्याचा प्रयत्न करतंय.

याव्यतिरिक्त भारद्वाज दिल्लीत कॅबिनेट मंत्री राहिले आहेत आणि ४९ दिवस चाललेल्या पहिल्या आप-काँग्रेस युती सरकारमध्ये वाहतूक, अन्न आणि पुरवठा आणि सामान्य प्रशासन खात्यांचा कार्यभार त्यांना देण्यात आला होता. ते पक्षाचे प्रवक्ते आणि सध्या दिल्ली वॉटर बोर्डाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांना हरियाणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

३. दिलीप पांडे

४१ वर्षांचे पांडे हे आप पक्षामध्ये क्रायसिस मॅनेजमेंटसाठी ओळखले जातात. मदतीचं काम करताना ते कधीच मागेपुढे पाहत नसल्याचं कळतं. कोविड-१९ संकटाच्या वेळी त्यांनी अनौपचारिकपणे स्वत:चे एक मदत केंद्र चालवलं होते, जिथे बेड, औषधे, ऑक्सिजन आणि रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या मदतीची व्यवस्था केली जात होती.

२०१९ मध्ये ‘आप’च्या लोकसभा निवडणुकीत पांडे स्टार उमेदवारांपैकी एक होते, ज्यांना ईशान्य दिल्लीतून तिकीट देण्यात आले होते. प्रचार गीतासाठी जेव्हा संगीतकाराने ऐनवेळी असाइनमेंट रद्द केली तेव्हा पांडेनेच शेवटच्या क्षणी हे काम हाती घेतले आणि ‘पूर्ण-राज’ नावाचे एक आकर्षक प्रचार गीत घेऊन आले होते, असं पक्षाचे कार्यकर्ते सांगतात.

पांडे विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर तिमारपूरमधून आमदार झाले. पक्षाचे प्रवक्ते आणि दिल्ली निमंत्रक असणाऱ्या पांडे यांची पक्षासाठीची निष्ठा इतकी आहे की, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत जेव्हा आप बीजेपीसमोर हरळी होती तेव्हा त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांना सध्या कर्नाटकसाठी नेमण्यात आलं आहे.

४. अजेश यादव

बिहारची नेमण्यात आलेले अजेश हे ५४ वर्षांचे असून २०१५ पासून ते बदली मतदारसंघाचे आमदार आहेत. मात्र त्यांना मीडियासमोर यायला जास्त आवडत नाही. व्यापारी असलेल्या यादव यांच्याकडे बँक्वेट हॉलची चेन आहे. विधानसभेच्या नोंदीनुसार गेल्या १० विधानसभा अधिवेशनांमध्ये यादव यांनी सभागृहात एक शब्दही उच्चारला नाहीये.

मात्र, अनधिकृत वसाहतींच्या विकासात यादव यांच्या भूमिकेचे पक्षांतर्गत कौतुक होत असतं. कारण बदली मतदारसंघ मुळातच अनधिकृत निवासी वसाहतींमध्ये बदललेल्या गावांचा विखुरलेला समूह आहे. या वसाहती दक्षिण दिल्लीतील संगम विहार सारख्या वसाहतींच्या खूप नंतर तयार झाल्या आणि काही वर्षांपूर्वीपर्यंत पाणीपुरवठा, गटार कनेक्शन आणि काँक्रीट रस्ते यासारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत होत्या. त्यांचाच विकास अजेश यादव यांनी केलाय.

५. गुलाब सिंग यादव

दिल्लीच्या मतियाला मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार असलेले ४३ वर्षांचे गुलाब सिंग गुजरातच्या पडद्यामागील आप कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. यादव २०१५ पासून स्थानिक आप युनिटसह गुजरातमध्ये काम करत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, २०१६ मध्ये जेव्हा दिल्ली पोलिस निराधार आरोपांवर एकामागून एक आप नेत्यांना अटक करत होते. तेव्हा ते गुलाब याना शोधत गुजरातच्या सुरत येथे आले आणि त्यांनी तिथून गुलाब यांना अटक केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लपण्याच्या आरोप लावला होता मात्र खरं तर गुलाब गुजरातमध्ये ग्राउंडवर फिरून काम करत होते.

६. विनय मिश्रा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पश्चिम दिल्लीचे माजी खासदार आणि चार वेळा आमदार राहिलेले महाबल मिश्रा यांचा मुलगा म्हणजे विनय मिश्रा. मिश्रा यांनी आदर्श शास्त्री यांची द्वारका सीटवर जागा घेतली असून ते ‘आप’च्या स्थापनेपासून सोबत होते.

२०२० च्या निवडणुकांपूर्वी, बहुतेक कॉंग्रेस नेत्यांना माहित होते की पक्षाला फारशी संधी नाही. म्हणून महाबल मिश्रा यांनी आपल्या मुलाला ‘आप’मध्ये सामील करून घेण्यासाठी जोरदार लॉबिंग केलं. त्यानुसार विनय मिश्रा यांची आपमध्ये एंट्री झाली. आता विनय मिश्रा हे आपचे राजस्थानचे प्रभारी आहेत.

७. अजय दत्त

ऑगस्ट २०१९ मध्ये दिल्लीतील रविदास मंदिर पाडण्यावरून वाद निर्माण झाला होता. दलित समाजातील लोक मोठ्या प्रमाणात संत रविदासांची पूजा करतात. तेव्हा या निर्णयाच्या निषेधार्थ, अजय दत्तने दिल्ली विधानसभेच्या बाहेर टीव्ही कॅमेऱ्यांसमोर आपला शर्ट फाडला. तेव्हापासून “दलित कारणासाठी” त्यांचा शर्ट फाडणारा आमदार असा त्यांचा उल्लेख होऊ लागला.

४६ वर्षीय दत्त दिल्लीच्या आंबेडकर नगर मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार आहेत. दत्त यांनी आतापर्यंत अनेक विधायी पॅनेलमध्ये पदे भूषवली आहेत ज्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कल्याण समित्या, सार्वजनिक खाती, सरकारी उपक्रम, पर्यावरण आणि विधानसभेच्या टेबलावर ठेवलेली कागदपत्रे यांचा समावेश आहे.

त्यांनी अजूनही सरकारमध्ये कोणतेही पद भूषवलेले नाही. तरीही पक्षात, ते अशा नेत्यांपैकी एक आहेत जे इतरांसाठी उदाहरणे आहेत, असे आपचे दुसरे नेते म्हणाले. ते हिमाचलचा चेहरा असणार आहेत.

८. संदीप पाठक

आपच्या राष्ट्रीय योजनेत आघाडीवर असलेले हे दुसरे पाठक आहेत. दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सहयोगी प्राध्यापक ते असून गुजरातचे संयुक्त प्रभारी म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले आहे. केजरीवाल यांचे आणखी एक जवळचे सहकारी असलेले पाठक हे पक्षाच्या पडद्यामागील कार्यकर्त्यांपैकी एक आहेत.

सीसीटीव्ही, वायफाय, घरातील राशन यासारख्या आपच्या अनेक प्रमुख धोरणांच्या मागे असलेला चेहरा ते आहेत.

पाठक हे पंजाबमधील आपच्या राज्यसभेतील निवडक लोकांपैकी एक आहेत आणि पुढील अधिवेशनापासून ते वरिष्ठ सभागृहात सामील होतील. २०२२ च्या निवडणुकांपूर्वी राज्यात पक्षाचा संघटनात्मक पाया तयार करणे, धोरणांची आखणी करणे, अजेंडा तयार करणे आणि प्रचार योजनांचा मसुदा तयार करण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यांचे सहकारी त्यांना “ग्राऊंडेड, समजूतदार आणि पद्धतशीर” नेता म्हणून संबोधतात. त्यांच्यावर गुजरातचा कारभार सोपवण्यात आलाय.

९. संजीव झा

४२ वर्षीय संजीव झा, दिल्लीच्या बुरारी मतदारसंघातून आपचे तिसर्‍यांदा आमदार झालेले नेटी आहेत. ते पक्षाचा चेहरा पूर्वांचली असून छठपूजेच्या व्यवस्थेदरम्यान टीव्हीवर हजेरी लावणे आणि दिल्लीच्या स्थलांतरित लोकसंख्येशी संबंधित मुद्द्यांवर पत्रकार परिषदांमध्ये, विशेषत: पूर्वांचलमधील इतर वरिष्ठ आप नेत्यांच्या शेजारी ते दिसतात.

बिहारमध्ये जन्मलेले आणि वाढलेले झा, आपचे सरचिटणीस राहिले आहेत आणि त्यांनी विद्यार्थी शाखा, छात्र युवा संघर्ष समितीच्या स्थापनेत सक्रिय भूमिका बजावली आहे. झा यांनी अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील इंडिया अगेन्स्ट करप्शन चळवळीत भाग घेतला होता. त्यांच्यावर छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आलीये.

१०. सोमनाथ भारती

मालवीय नगरमधील आपचे तिसर्‍यांदा आमदार आणि माजी मंत्री असलेले सोमनाथ भारती म्हणजे आपचा सर्वात जास्त ओळखला जाणारा चेहरा आहेत. कायदेशीर बाबींवर त्यांची चांगली पकड, सार्वजनिक प्रशासनातील कौशल्य आणि त्यांच्या मतदारसंघातील सुलभता यासाठी ते ओळखले जातात.

भारती ४९ दिवसांच्या आप-काँग्रेस युती सरकारमध्ये कायदा, पर्यटन, प्रशासकीय सुधारणा आणि कला आणि संस्कृती या खात्यांचे प्रभारी मंत्री होते. २०१४ ते २०२१ दरम्यान, भारती यांनी सार्वजनिक खाती आणि विशेषाधिकार समितीपासून ते दिल्लीतील भटक्या कुत्रे आणि माकडांच्या समस्येवर काम करणाऱ्या समितीपर्यंतच्या पॅनेलचे नेतृत्व केलं आहे.

भारती यांचाही वादात वाटा आहे. २०१४ मध्ये जेव्हा त्यांनी दक्षिण दिल्लीच्या खिरकी एक्स्टेंशन परिसरात आफ्रिकन नागरिकांच्या गटाला लक्ष्य करून स्थानिक लोकांसह मध्यरात्री छापा टाकला. शिवाय २०१५ मध्ये त्यांना घरगुती अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आली.

मात्र वाद हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू आहे. आणि त्यापैकी बहुतेक निराधार निघाले आहेत. दुसरा पैलू म्हणजे ते त्यांच्या क्षेत्रातील मास्टर आहेत. आणि म्हणूनच त्यांनी पक्षात महत्त्वाची पदे भूषविली आहेत. आता त्यांना तेलंगणासाठी नवीन पद देण्यात आले आहे, असं आपचे इतर नेते सांगतात.

अशाप्रकारे हे आपचे १० नेते आता पक्षाच्या देशभर विस्तारासाठी कार्ड म्हणून कार्य करणार आहेत. तेव्हा कोण बाजी मारत राज्य जिंकत हे बघणं गरजेचं आहे.

हे ही वाच भिडू :

The post पंजाब मिळवल्यानंतर देशभरात सत्तास्थापनेसाठी आप आता या लोकांवर बोली लावतंय appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: