सर्वांत लांब बोगदा! पनवेल- कर्जत उपनगरी रेल्वेमार्गावर महिनाअखेरीस काम सुरू

March 07, 2022 0 Comments

मटा विशेष म. टा. प्रतिनिधी, मुंबईः पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे प्रकल्पांतर्गत एक बोगदा उभारण्यात येणार असून तो महामुंबईतील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) हा बोगदा उभारण्यात येणार असून चालू महिन्याच्या अखेरीस त्याचे काम सुरू होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि कल्याण स्थानकांतील गर्दी मोठ्या प्रमाणात विभागली जाणार आहे. एमआरव्हीसीच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी-३) अंतर्गत पनवेल-कर्जत रेल्वे प्रकल्प आकार घेत आहे. या प्रकल्पात एकूण तीन बोगदयांची उभारणी करण्यात येणार आहे. यापैकी वावर्ले बोगदा २.६ किमी लांबीचा आहे. ठाणे-दिवा दरम्यानचा पारसीक बोगदा हा महामुंबईतील सध्याचा सर्वाधिक लांबीचा (१.३ किमी) बोगदा आहे. या बोगदयाचे काम १९०६ मध्ये सुरू झाले होते. हा बोगदा वाहतुकीसाठी १९१६मध्ये खुला झाला होता. पनवेल-कर्जत रेल्वे प्रकल्पात नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे उभारण्यात येणार आहेत. या तिन्ही पुलांची रुंदी १४ मीटर आणि उंची ७.५० असणार आहे. नढालची लांबी २१९ मीटर आणि किरवलीची लांबी ३०० मीटर आहे. वावर्ले बोगदा पूर्ण झाल्यावर हा मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा असणार आहे, असे एमआरव्हीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या बोगद्या व्यतिरिक्त कर्जतजवळ १२२५ मीटर आणि पनवेललगत १३७५ मीटरचे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. या मार्गावर लहान-मोठे असे एकूण ४४ पूल असतील. त्याचबरोबर रूळ ओलांडणी टाळण्यासाठी एक पादचारी पूलदेखील उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ५० टक्क्यांहून अधिक भूसंपादन झाले असून एप्रिलअखेर संपूर्ण भूसंपादन करण्याचे लक्ष्य आहे. १०,९४७ कोटींच्या एमयूटीपी ३ प्रकल्प संचासाठी एआयआयबीसारख्या संस्थाकडून ६१२८ कोटीचा निधी कर्जाऊ स्वरूपात उभारण्यात आलेला आहे. पनवेल-कर्जत रेल्वेसाठी २७८२ कोटीची तरतूद असून प्रकल्पपूर्तीकरिता मार्च २०२५ ही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. प्रवासाच्या कालावधीत व खर्चात बचत वावर्ले बोगद्यामधून दोन रेल्वे मार्गिका जाणार आहेत. बोगदा उभारण्यापूर्वीची कामे सध्या सुरू आहेत. पनवेल-कर्जत उपनगरी मार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यावर रेल्वे प्रवाशांच्या वेळेत आणि प्रवासखर्चात मोठी बचत होईल, असे एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रवी अग्रवाल यांनी सांगितले. असा आहे रेल्वेमार्ग स्थानके -एकूण ५ (पनवेल, चिखले, मोहापे, चौक, कर्जत ) रेल्वे मार्गिकांची एकूण लांबी- ३० किमी उड्डाणपूल- २ बोगदे- ३ पूल- ४४ (८ मोठे पूल, ३६ लहान पूल) आरओबी/आरयूबी- ५ रोड ओव्हर ब्रिज, १५ रोड अंडर ब्रिज, रूळ ओलांडणीसाठी एक पादचारी पूल


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: