भारतीय माणसानं आयडिया केली आणि चायनीज फूडलाचं देशी बनवलं

March 21, 2022 , 0 Comments

आपला भारत हा खवय्यांचा देश. इथल्या वेगवेगळ्या कल्चर, राज्य, भागानूसार पदार्थ फेमस आहेत, तेवढ्यावरचं नाही तर ‘आऊट ऑफ इंडिया’ वाले पदार्थसुद्धा आम्ही आवडीने खातो आणि त्यात सगळ्यात फेमस म्हणजे चायनीज फूड.

भारतात सर्वाधिक मागणी असणाऱ्या पदार्थांमध्ये चायनीज दुसऱ्या नंबरवर आहे, असा एक सर्वे सांगतो. आता चायना या शब्दाबद्दल आपल्याला कितीही राग असला तरी ही गोष्ट नाकारून चालत नाही की चायनीज फूडवर आपल्या सगळ्यांचं मात्र प्रेम आहे. पण या चायनीज पदार्थांवर एका भारतीय ब्रँडचा एक्का चालतो, तो म्हणजे चिंग्स सीक्रेट.

आता चिंग्स सिक्रेट म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर लगेच रॉकेटवर बसलेला तो रणवीर सिंग आठवणार. मुळातचं अतरंगी असलेला रणवीर या चिंग्सच्या जाहिरातीत आणखीनचं अतरंगी दिसतो. पण ते काहीही असलं तरी भिडू चिंग्स हे चायनीज फूडचं इंडियन सिक्रेट आहे.

कारण बऱ्याच जणांना वाटेल की, चायनीज फूडचं हे सीक्रेट एखाद्या चिनी माणसानं तयार केलेलं असेल, पण तूमच्या माहितीसाठी चिंग्स सिक्रेट हा ब्रँड अजय गुप्ता नावाच्या भारतीयानं तयार केलायं.

अजय गुप्ता यांना चिंग्स सीक्रेटची आयडिया कशी सुचली तर जसं की भिडूनं आधीच सांगितलं चायनीज फूडची भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी लोक ते आवडीने खातात सुद्धा आणि घरी बनवतात सुद्धा तिथूनच अजय यांच्या डोक्यात या चिंग्स सिक्रेटची आयडीया सुचली.

अजय गुप्ता यांनी 1996 साली आपल्या कॅपिटल फुड अंडर चिंग्स सिक्रेट लॉन्च केलं. ज्यात रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, नूडल्स असे पदार्थ दिले जात होते. त्यावेळी दुसरी कुठली कंपनी अशा उत्पादनांमध्ये ते पण एवढ्या मोठ्या स्तरावर उतरली नव्हती, त्यात चायनीज फूडच्या मोठ्या मागणीमुळे किंग्सला झटपट पॉप्यूलॅरिटी मिळाली.

चिंग्स सिक्रेट या ब्रँड नावामागची स्टोरी सांगताना अजय यांनी तिला एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांना ही आयडिया शेवटच्या चिनी राजवंशाच्या नावावरून सुचली जी ‘क्विंग’ राजवंश होती, ज्याला ‘चिंग’ असं म्हटलं जायचं. या राजवंशाच्या काळातच चिनी खाद्यपदार्थ फेमस झाली असं म्हणतात. त्यामुळे अजय यांनी आपल्या ब्रँडचं नाव चिंग्स सिक्रेट असं ठेवायचं ठरवलं.

पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिंग्सची जबरदस्त अॅडव्हरटायजिंग मार्केटिंग. जी आपल्या सगळ्यांनाच चांगलीच माहितीये, अजय गुप्ता यांनी आपल्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी भारतीयांच्या जवळचा असणाऱ्या बॉलीवूडचा वापर करायचं ठरवलं, आणि अभिनेता रणवीर सिंग याला ब्रँड ॲम्बेसिडर बनवलं.

रणवीरची हटके स्टाइल आणि कंपनीची हटके जाहिरात यामुळे चिंग्सला दुप्पट फायदा झाला. त्यात चिंग्सची सेजवान चटणी तर जाहीराती सारखीचं एकदम रॉकेट ठरली.

त्यात 2015 साली कंपनीने देसी चायनीज या नावावर मार्केटिंग सुरू केली आणि त्यात जिंगल्स सुद्धा जोडले. त्यामुळे प्रॉडक्टची आपोआप माउथ पब्लिसिटी झाली. त्यात हटके जाहिरातींमुळे सोशल मीडियावर मीन्स सुद्धा व्हायरल होऊ लागले, ज्याचा कंपनीला मोठा फायदा झाला.

याचा परिणाम म्हणजे 2014 मध्ये चिंग्सचे जवळपास 60,000 स्टोअर्स होते, जे काही महिन्यातचं 150,000 वर गेले. पण या सगळ्यात कंपनीसाठी मास्टरस्ट्रोक ठरला, तो चित्रपट. कंपनीने दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मदतीनं ‘ रणवीर चिंग्स रिटर्न एक शॉर्ट फिल्म बनवली, जी प्रेक्षकांना आवडली सुद्धा ज्यामुळे ब्रँडची मार्केटिंग जवळपास 2,75,000 स्टोअरपर्यंत पोहोचली.

अजय गुप्ता यांनी एका मुलाखतीत सांगितले की, कंपनीने 9 ऑक्टोबरला सोशल मीडियावर हा चित्रपट लॉन्च केला आणि 15 ऑक्टोबरलाच शिकागो, यूएसए येथून शेझवान चटणीची ऑर्डर मिळाली होती. आज कंपनी 12 पेक्षा जास्त प्रॉडक्टमध्ये वेगळा ब्रँड तयार झालीये. आणि कंपनीचा टर्नओवर 700 कोटींच्यावर जाऊन पोहोचलाय.

आता हा झाला आकड्यांचा खेळ, पण भिडू कंपनीच्या सक्सेसचा अंदाज इथूनचं लावला जाऊ शकतो की, आज भारतातल्या प्रत्येक चायनीज फूड लव्हर्स फॅमिलीमध्ये चिंग्सचे प्रॉडक्ट हमखास सापडतात.

हे ही वाचं भिडू :

The post भारतीय माणसानं आयडिया केली आणि चायनीज फूडलाचं देशी बनवलं appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: