गडकरींची ‘उडणारी बस’ यापैकीच एक असेल

March 27, 2022 , 0 Comments

gadkari bus

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी  यांचं काम बोलतं असं अनेक जण म्हणतात. गडकरी पण अनेक नव नवीन कल्पना आणून आपलं रस्ते बनवायचं काम चोख पार पडताना दिसतात. नुकताच त्यांनी रस्ते बनवायच्या कामातच विश्वविक्रम करून दाखवाला होता.

 सध्या गडकरी अजून एका कामासाठी चर्चेत आहेत ते म्हणजे त्यांनी हवेत उडणाऱ्या बसेस आणण्याच्या केलेल्या घोषणेमुळे.

यासंबंधी त्यांनी पहिली घोषणा केली होती उत्तरप्रदेशच्या  प्रयागराजमध्ये.  लोकांच्या फायद्यासाठी प्रयागराजमध्ये लवकरच “उडत्या बसेस” सुरू होतील असं त्यांनी म्हटलं होतं.  त्यानंतर उत्तरप्रदेशातील प्रयागराज पाठोपाठ नागपूरात ही हवेतून धावणारी बस अर्थात केबल बस सुरू करणार असल्याचे जाहीर केले. यासाठी गडकरी यांनी आराखडा तयार करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.

३५ ते ४० सीटर ही केबल बस सध्या फिलिपिन्समध्ये चालवली जात असून त्याच धर्तीवर नागपूरात ही केबल बस सुरू केली जाईल, असे गडकरी म्हणाले होते.

आता इथं फरक असा आहे प्रयागराजमध्ये गडकरी उडती बस आणणार आहेत तर नागपूरमध्ये केबल बस. तर पाहिलं हे केबल बस काय असते त्यापासून सुरवात करू. तर नागपूरमध्ये बोलताना गडकरी यांनी स्वतःच केबल बस बाबत डिटेल्स दिले होते.

नागपूरमधून हवेतून उडणारी बस म्हणजे केबलला कनेक्ट केलीली बस असेल असं ते म्हणाले होते.  

तर आता नावावरूनच तुम्हला कळलं असेल की यात केबलचा उपयोग असणार आहे. म्हणजे जवळपास रोपवे सारखीच ही सिस्टिम असेल.

 एरियल ट्राम, स्काय ट्राम, केबल कार किंवा जपानमध्ये नुसतं रोपवे या नावाने ही सिस्टिम चालवली जाते. 

जसे रोपवेमध्ये असतं तसंच जमिनीपासून उंच असणाऱ्या या सिस्टिममध्ये ठराविक अंतरावर असणाऱ्या दोन टॉवर्सच्या दरम्यान केबल फिक्स केल्या जातात. आणि केबिन्स ज्यामध्ये प्रवासी बसू शकतात त्या या केबलच्या आधारे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेल्या जातात. यामध्ये पण कॅबिनमध्येच इंजिन किंवा स्विस गंडोला एअर लिफ्ट ज्यामध्ये इंजिन कॅबिनला जोडलेलं नसतंय असे दोन वेगळे प्रकार असतात. 

या सिस्टिममध्ये बीआरटी सारखा एक्सक्लुसिव्ह मार्ग असेल पण तो जमीनीवर नसेल त्यामुळे या मार्गावरून वाहतूक जलद होईल.

तसेच टोटली इलेक्ट्रिक सिस्टिमवर चालत असल्याने गडकरी म्हणतात तसं ही ट्रान्सपोर्ट सिस्टिम इको-फ्रेंडली देखील बनवता येइल. तसी जगात फिलिपाइन्स, जपान, अमेरिका, ब्राझील, स्वित्झर्लंड या देशात अशी सेवा चालू आहे. पण याला  मास ट्रान्सपोर्टमध्ये म्ह्णून चालवणं हे भारतापुढील आव्हान असणार आहे.

आता हे झालं ट्रॅडिशनल मॉडेल. पण भारतातही आता जगात जे नाही किंवा अगदी डेव्हलपमेंटच्या सुरवातीच्या टप्यात आहे अशा टेक्नॉलॉजी आणण्याची घोषणा केली जात आहे. उदाहरण द्यायचंच झालं तर 

जगात अजून कुठेच प्रत्यक्षात काम करत नसलेलं हायपरलूप मुंबई पुणे या दोन शहरांच्या दरम्यान लावण्याची करण्यात आलेली घोषणा. 

तर असच ऐरिअल ट्रान्सपोर्ट क्षेत्रात म्हणजेच हवाई वाहतूक मध्ये एक नवीन टेक्नॉलॉजि सध्या नावारूपाला येत आहे ती म्हणजे  e-VTOL टेकनॉलॉजि.

 इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग म्हणून ओळखली जाणारी ही वाहनं गडकरी म्हणतात तसे खरो खरंच हवेत उडणारी आहेत. या हवेत उडणाऱ्या वाहनांना विमानासारखी धावपट्टी लागत नाही की ते हेलिकॉप्टरसारखा जोरात आवाज करतात. या  e-VTOL वाहनांना इलेक्ट्रिक हेलिकॉप्टर म्हटलं तरी चालू शकतंय. 

विमानतळावर लागणार वेळ आणि हेलिकॉप्टरला गर्दीच्या ठिकाणी किंवा कमी जागेत उतरवण्यासाठी जे अडथळे येतात ते यामुळे कमी होणार असं सांगण्यात येतं. याच सगळ्यात जवळची कॉन्सेप्ट तुम्हाला इमॅजिन करायची असेल तर ड्रॉन इमॅजिन करा आणि आता हे लक्षात घ्या की ते माणसं वाहून नेण्याएवढं मोठं आहे. 

बर आतापर्यंत sci-fi  पिक्चरमध्ये दिसणारी हे हवेत उडणारी वाहनं प्रत्येक्षात येण्यासाठी खूप वेळ लागणार आहे अशातली पण गोष्ट नाहीये. 

मॅकिन्से अँड कंपनी या कंपनीच्या अंदाजनुसार २०३० पर्यंत तुमच्या शहरात अशी शेकडो e-VTOL कॅटॅगरीतली वाहनं तुम्हाला उडताना दिसू शकतील. 

या वाहनांचे ट्रायल  सध्या ५-६ लोकांना वाहून नेण्यापर्यंतच मर्यादित असले तरी भविष्यात त्याला मास ट्रान्सपोर्ट करण्याचे प्रयत्नही काही कंपन्यांकडून चालू आहेत. एअरबस ही विमानं बनवण्यात अग्रेसर असेलेली या कंपणीने त्यांच्या सिटीबस या कंपनी e-VTOL वाहनाची यशस्वी चाचणी घेतल्याचं म्हटलं आहे.

 रोल्स रॉयसचं इंजिन वापरून चालू असणाऱ्या एअरबसच्या सिटीबस या प्रोजेक्ट्मधे सध्या ४ ते ५ माणसाचं वाहून नेण्याची क्षमता असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे एअर टॅक्सी याच कॅटेगरीत हे सगळे प्रोजेक्ट येतात. 

पण जर ही कॅटगरी सक्सेसफुल झाली तर या कंपन्यांचं पुढचं लक्ष या वाहनांची प्रवासी वाहुतक क्षमता वाढवणं असू शकतं.

त्यामुळे अशी वाहनं देखील गडकरी भारतात आणतील का हे पाहण्यासारखं असणार आहे. बाकी तुम्हाला कुणी आपल्या साध्या बसला विमानाचे पंख लावून उडणारी बस म्ह्णून दाखवलं असेल तर तुम्हाला ते सपशेल गंडवायला निघालेत. हवेत उडणारी वाहनं जरी भविष्यात येणार असली तरी त्यांचं डिझाइन, आकार हे सर्व जमिनीवरच्या वाहनांपेक्षा खूप वेगळं असणार आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

The post गडकरींची ‘उडणारी बस’ यापैकीच एक असेल appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: