एसटी संप मिटणार?; विधानपरिषदेत तोडगा निघण्याची शक्यता

March 10, 2022 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः एसटी कर्मचाऱ्यांचे सरकारी सेवेत विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून एसटी संप मिटण्याची शक्यता आहे. आज, गुरुवारी सकाळी १० वाजता विधान परिषदेचे सभापती बैठकीतून निघालेल्या तोडग्याबाबत सभागृहात माहिती देणार आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या निर्देशानुसार एसटी संपाबाबत आमदारांची समिती स्थापन करण्यात आली आहे. आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्याच्या सूचना सभापतींनी या समितीला मंगळवारी दिल्या होत्या. त्यानुसार आमदारांची समिती स्थापन करण्यात आली. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी एसटीसंदर्भात महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला भाजप नेते गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: