सेल्फी बेतला जीवावर; शेततळ्यात बुडणाऱ्या मुलीला वाचवायला गेलं अन् अघटित घडलं!

March 14, 2022 0 Comments

अमरावती: पथ्रोट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुष्ठा गावालगत असलेल्या एका शेतातील शेत तळ्याजवळ सेल्फी घेताना शेततळ्यात पडलेल्या मुलीला वाचण्यासाठी गेलेल्या युवकाचासुद्धा बुडून दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि. १३) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या दोघांचाही पोलिस व गावकऱ्यांनी रविवारी रात्रीपर्यंत शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. अंधार झाल्यामुळे आज सकाळी शोध कार्य करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हर्षाली विनोद वांगे (११, रा. कुष्ठा) असे शेत तळ्यात पडलेल्या मुलीचे तर बाजीलाल कास्देकर (२५, कुष्ठा) असे मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या युवकाचे नाव आहे. कुष्ठा गावालगतच हरिभाऊ नाथे यांचे शेत आहे. नाथे यांच्या शेतात शेततळे आहे. या शेत तळ्याजवळ हर्षाली दुपारी खेळण्यासाठी गेली होती. दरम्यान, सेल्फी घेत असताना पाय घसरुन हर्षाली शेत तळ्यात पडली. यावेळी नाथे यांच्या शेतातच काम करणारा युवक बाजीलाल कास्देकर याने हर्षालीच्या बचावासाठी शेत तळ्यात उडी घेतली. मात्र बराच वेळ होऊनही हर्षाली किंवा बाजीलाल बाहेर आले नाही. हि माहिती गावकऱ्यांना मिळताच शेततळ्याजवळ गावकऱ्यांनी गर्दी झाली. या घटनेची माहिती पथ्रोटचे ठाणेदार सचिन जाधव यांना देण्यात आली. त्यामुळे पथ्रोट पोलिससुद्धा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आज सोमवारी नऊ वाजेपर्यंत दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: