Valentine आठवड्यात अघटित घडलं, या कारणामुळे प्रेमी युगुलाची हॉटेलमध्ये विष पिऊन आत्महत्या!

February 12, 2022 0 Comments

गोंदिया : व्हॅलेंटाईन डे 2 दिवसांवर आलाय. सगळीकडे तरुणाई उत्साहात दिसतेय. व्हॅलेंटाईन विक साजरा केला जातोय. पण तिकडे गोंदियामध्ये मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. गोंदिया शहरातील हॉटेल एव्हर ग्रीनमध्ये एका जोडप्याने विष पिऊन आत्महत्या केली आहे. काल (गुरुवारी) रात्रीची ही घटना आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गोंदिया शहरातील हॉटेल एव्हर ग्रीनमध्ये एका जोडप्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठविण्यात आले आहेत. प्रेमी युगुलाच्या घरच्यांचा दोघांच्या नात्याला विरोध होता, त्यामुळे युगुलाने टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे. मात्र नेमकी कुठल्या कारणातून ही घटना घडली, याचा शोध गोंदिया ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत. या जोडप्यातील तरुणी ही केवळ 21 वर्षाची तर तरुण 22 वर्षाचा आहे. ही नागपूरची तर आकाश छेतीया हा तरुण गोंदियाचा रहिवासी आहे. आकाश आणि रोहिणी हे दोघेही एव्हर ग्रीन हॉटेलच्या रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. अश्या अवस्थेत दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या कश्यामुळे करण्यात आली याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: