करोनाचा धोका कमी झाल्यामुळे चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू होणार?

February 20, 2022 0 Comments

पुणे : करोनारुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागल्याने निर्बंध कमी करा, अशी सूचना केंद्र सरकारने केल्यानंतर राज्य सरकार निर्बंध शिथिल करण्याच्या विचारात असून, नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे लवकरच शंभर टक्के आसन क्षमतेने सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक मार्चपासून थिएटर पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचा विश्वास थिएटर व्यावसायिकांना वाटत आहे. सरकारने निर्णय घेतल्यास मार्च २०२० नंतर राज्यात पहिल्यांदाच थिएटर शंभर टक्के क्षमतेने सुरू होतील. देशातील अनेक राज्यांमध्ये; तसेच विशेषत: दक्षिणेकडील राज्यांमध्ये चित्रपटगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू आहेत. देशाचे चित्रपट केंद्र असलेल्या महाराष्ट्रात निर्बंधांमुळे चित्रपटांचे प्रदर्शन निर्मात्यांना पुढे ढकलावे लागत आहे. सर्व व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू असताना केवळ नाट्यगृहे, चित्रपटगृहे, उद्याने, जलतरण तलाव पन्नास टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यामागे तर्क काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यात महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर नाट्यगृह, सभागृह आणि मोकळ्या जागेत राजकीय पक्षांचे मेळावे गर्दीत होऊ लागल्याने एकीकडे उपस्थितीच्या नियमाला हरताळ फासला जात असताना त्याच वेळी नाटक आणि चित्रपटांना पन्नास टक्के आसनक्षमतेची सक्ती कायम असल्याने मनोरंजन क्षेत्रामध्ये नाराजी आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरला पन्नास टक्के आसन क्षमतेने सुरू झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील थिएटर पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची घोषणा केली. मात्र, करोनारुग्ण वाढू लागल्यामुळे सरकारने हा निर्णय रद्द करून थिएटर पन्नास टक्के आसनक्षमतेनुसारच सुरू ठेवली. देशातील व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू असताना; तसेच अनेक राज्यांमधील चित्रपटगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू असताना केवळ महाराष्ट्रातच निर्बंध का, हे समजत नाही. सरकारने चित्रपटगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्यावी. - प्रकाश चाफळकर, संचालक-सिटी प्राइड करोनाकाळात चित्रपट क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. चित्रपटगृहे दीर्घ काळ बंद राहिली तरी सरकारने कसलेही शुल्क माफ न केल्याने व्यवसाय बंद असताना भुर्दंड सहन करावा लागला आहे. सरकारने किमान एक मार्चपासून चित्रपटगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू केली, तर एकपडदा चित्रपटगृहे टिकतील. - विलास टापरे, वसंत सिनेप्रो काही राज्यांतील चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू असली तरी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांना पन्नास टक्के आसन क्षमतेचा नियम लागू असल्याने अनेक निर्मात्यांना चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलावे लागत आहेत. ते महाराष्ट्रातील चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची वाट पाहत आहेत. मोठे सिनेमे 'ओटीटी'वर प्रदर्शित होऊ शकत नाहीत. - गौरव शहा, सिनेप्रो एन्टरटेन्मेंट


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: