आश्रमशाळेतून २२ लॅपटॉप चोरीला गेले; पोलीस तपासातील माहितीनंतर उडाली खळबळ!

February 16, 2022 0 Comments

: पानबारा येथील शासकीय आश्रमशाळेतून २२ लॅपटॉप चोरीला गेल्याची माहिती समोर आली होती. या गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात छडा लावला आहे. पाच विधीसंघर्षग्रस्त बालकांनी फक्त मौजमजेसाठी सदरची चोरी केली असून चोरीचा एक लॅपटॉप खरेदी करणाऱ्या व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे. () नवापूर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा पानबारा येथून १२ तारखेला २२ लॅपटॉप चोरी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणारे हे लॅपटॉप चोरी झाल्यानंतर या सर्व प्रकरणाचा छडा लावण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होते. विसरवाडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या नेतृत्वात तपास सुरू केला होता. याच दरम्यान गोपनीय बातमीदारांकडून शेजारील एका गावातील आश्रमशाळेत विद्यार्थ्याकडे असाच लिनोव्हो कंपनीचा लॅपटॉप असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीसांनी सदर गावात जात या विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. सदर बालकाची विचारपूस केल्यानंतर आपल्या इतर चार साथीदारांच्या मदतीने पानबारा येथील आश्रमशाळेतून लॅपटॉप चोरीची कबुली त्याने दिली. यानंतर या सर्व ५ विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून २१ लॅपटॉप जप्त करण्यात आले, तर एक लॅपटॉप हा धवल प्रजापत नामक इसमाला आठ हजार रुपयांना विकण्यात आला होता. चोरीचा लॅपटॉप विकत घेतल्याप्रकरणी या पाच विधीसंघर्षग्रस्त बालकांसमवेत लॅपटॉप विकत घेणाऱ्या प्रजापत यास अटक करण्यात आली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: