मित्रांना वांड फोटो फॉरवर्ड कसे करायचे याच्या उत्तरातून तयार झालं हे सगळ्यात फेमस पेज

February 05, 2022 , 0 Comments

प्रत्येक व्हाटसऍप ग्रुपवर एक मेंबर असं असतोय जो नित्त नियमाने ग्रुपवर मॅसेज टाकण्याची प्रथा पाळत असतोय.  सुरवातीला असलेली ग्रुपची एक्ससाइटमेन्ट संपली तर  फक्त या लोकांच्या जीवावर ग्रुप तग धरून असतो. त्यातही ग्रुपवर ‘खळबळ’ माजवणाऱ्या पोस्ट टाकण्यासाठी या बेण्यांचा पार आटापिटा चालू असतोय.कुठून शोधतात माहित नाही पण ग्रुपला ट्रेंडनुसार कोणते व्हिडीओ, फोटो,मीम चालतायत याचा पुरवठा हे कार्यकर्ते बरोबर करत असतात.

आता या अशाच एक कार्यकर्त्याच्या चळवळीतून उभा राहिलंय 9GAG.इंटरनेटवर मग ते फेसबुक असू द्या का इंस्टाग्राम आपलं सगळ्यात जास्त टाइमपास करणारं पेज असतंय 9GAG.

या पेजचा फाउंडर रे चॅन सांगतो “आम्हाला मुळात आमची स्वतःची समस्या सोडवायची होती — ती म्हणजे, आम्ही वांड पिक्चर कसे शोधू शकू? मी ते माझ्या मित्रांसोबत कसे शेअर करू?”.

२००८ मध्ये मग चॅन आणि त्याचे चार भागीदार जे जवळपास  विशीतलेच होते, त्यांनी एकत्रितपणे $१२७० जमा करून 9GAG सुरु केले.  या सगळ्यांनी आप आपले जॉब्स सांभाळत ऍज ए हॉबी म्हणून सुरवातीला ही वेबसाइट सुरु केली होती.

जेव्हा चॅनने 9GAG ची स्थापना केली, तेव्हा तो पुस्तकांच्या चाहत्यांसाठी एका ऑनलाइन प्रोजेक्टमध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करत होता आणि आपल्या मोकळ्या वेळेत इतर कल्पनांवर प्रयोग करत होता.त्यातलाच एक होता 9GAG.

“वेगवेगळ्या अतरंगी गोष्टी करून पाहायला इंटरनेट हे एक मस्त व्यासपीठ आहे ” असं चॅन सांगतो.

सुरुवातीला, चॅन आणि त्यांच्या सह-संस्थापक त्यांच्या मित्रांमध्ये फक्त 9GAG वापरत होते, मग हळूहळू त्यांच्या मंडळाच्या पलीकडे याचा विस्तार होऊन बाकीच्या ठिकाणाहूनही रहदारी येऊ लागली. त्याच वेळी, Facebook आणि Twitter  सारखी सोशल नेटवर्क्स फॉर्मला यायला सुरवातच झाली होती. मग बाकीच्या वेबसाइट सारखं 9GAG पण या प्लॅटफॉर्मवर उतरलं आणि तुफान चालू लागलं. 9GAG फॉर्मात आल्यानंतर मग चॅन आणि त्यांचे सहकारी पूर्णवेळ या वेबसाइटसाठी देऊ लागले. 

आता आपल्या सगळ्यांच्या कामाचा प्रश्न 9GAG नक्की कसं काम करतं.

9GAG वर, वापरकर्ते साइटवर त्यांचे स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करू शकतात. मग यातलं बरेच कंटेन्ट मग साइटवर टाकलं जातं. म्हणजे लोकांचं कंटेन्ट पुन्हा लोकांनाच दिलं जातं. या साइटवर सध्या इंटरनेटवर काय ट्रेंडिंग काय आहे हे पण शोधू शकतात. मग या कंटेन्ट मधल्या सोशल मीडिया पोस्ट 9GAG च्या सात ते आठ संपादकांद्वारे क्युरेट केल्या जातात.

साइटवरील जाहिराती हा 9GAGच्या कमाईचा सर्वात मोठा स्रोत बनली आहे.

टाइमपास म्हणून सुरु झालेल्या 9GAG मध्ये आता सिलिकॉन व्हॅलीतील २२ गुंतवणूकदारांकडून $२.८ दशलक्ष निधीची गुंतवणूक केली आहे. 9GAGचा जर महिन्याला १५० दशलक्ष कार्यकर्ते स्क्रोल करतात. त्याच्या फेसबुक पेजला ४१ दशलक्ष लाईक्स आहेत आणि त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटला ५१ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. 

बाकी मॉरल ऑफ द स्टोरी चॅन म्हणतो तसं अतरंगी गोष्टी करून पाहायला इंटरनेट हे एक मस्त व्यासपीठ आहे आणि बऱ्यापैकी फ्री आहे त्यामुळं तुम्हला जे किडे करायचे आहेत ते आत्ताच करा म्हणजे 9GAG सारखी लॉटरी लागली तर लागली.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

The post मित्रांना वांड फोटो फॉरवर्ड कसे करायचे याच्या उत्तरातून तयार झालं हे सगळ्यात फेमस पेज appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: