आर्मीचे कपडे आणि काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी; तोतयाचे पराक्रम बघून पोलीसही चक्रावले!

February 20, 2022 0 Comments

: सैन्य दलातील अधिकाऱ्यांसारखा दिसणारा बनावट युनिफॉर्म, ओळखपत्र वापरून नोकरीचे आमिष दाखवत युवकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतयाला नगर पोलिसांनी पकडलं आहे. नवनाथ सावळेराम गुलदगड (वय २४, रा. आग्रेवाड़ी, म्हसगांव, ता. राहुरी, जि. नगर) असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व मिलेट्री इंन्टेलिजेन्स दक्षिण कमान यांनी संयुक्तपणे शनिवारी (१९ फेब्रुवारी) ही कारवाई केली. () नगर जिल्ह्यात एक व्यक्ती लष्करी अधिकारी असल्याचे भासवून युवकांना लष्करात भरती करतो असं सांगत फसवणूक करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना सूचना करून कारवाईचा आदेश दिला. यासाठी लष्कराच्या गुप्तचर विभागाचीही मदत घेण्यात आली. हा व्यक्ती सैन्यदलाचा ड्रेस घालून कमांडो असे लिहिलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वापरत असे. तसंच राहुरी, संगमनेर परिसरातील युवकांना सैन्यदलामध्ये भरतीचे आमिष दाखवून पैशाची मागणी करत फसवणूक करत आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. शनिवारी हा व्यक्ती संगमनेर तालुक्यातील मांडवा गावाच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक तेथे गेले आणि त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव नवनाथ सावळेराम गुलदगड (वय २४, रा. आग्रेवाडी, पोस्ट म्हंसगांव, ता. राहुरी, जि. नगर) असं सांगितलं. आरोपीने बंगळुरु, कर्नाटक येथे लेफ्टनंट पदावर नोकरीला असल्याचंही सांगितलं. तसं ओळखपत्रही त्याने दाखवलं. त्याआधारे लष्करी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाकडे चौकशी केली असता असा कोणीही अधिकारी तेथे नोकरीला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा तोतया असल्याची पोलिसांना खात्री पटली. सखोल चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. त्यांनी कसून चौकशी केल्यावर मात्र त्याने बोलायला सुरुवात केली. आपण लष्करी अधिकारी असल्याचे खोटे सांगून युवकांना फसवल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सैन्यदलासाठी वापरण्यात येणारे ओळखपत्र, युनिफॉर्म व युनिफॉर्मवर लावण्याचे चिन्ह, नेमप्लेट व फित, आर्मीच्या नोकरीसाठी वेगवेगळ्या लोकांकडून भरुन घेण्यात आलेले अर्ज, छापील नियुक्ती पत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर बनावट साहित्य मिळून आले. त्याने वेळोवेळी मोबाईल नंबर बदलून तसेच सैन्य दलातील वेगवेगळ्या वरीष्ठ अधिका-यांचे युनिफॉर्म वापरुन अनेक युवकांची सुमारे ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे चौकशी उघडकीस आले. अखेर आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. राहुरी पोलिसांकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: