'व्हॅलेंटाइन डे' विशेष: 'हे आहेत खरे व्हॅलेंटाईन'; संघर्षमय आयुष्यात देताहेत जोडीदाराला साथ

February 14, 2022 0 Comments

-संघर्षमय आयुष्यात देताहेत जोडीदाराला साथ -'' विशेष म.टा. प्रतिनिधी, नागपूर: 'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सर्वांचं सेम असतं', असे आजची तरुणाई बिनधास्तपणे म्हणू लागली आहे. प्रेम करणे वाईट नाही, म्हणून बेधडकपणे स्वत:च्या भावना व्यक्त करण्याकडे तरुणाईचा कल असतो. मात्र, अनेकदा प्रेमाचा खरा अर्थ न कळल्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. प्रेम म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण नसून आयुष्यभर सुख-दु:खात सोबत राहण्याची कमिटमेंट आहे, हे आजच्या पिढीला समजणे गरजेचे आहे. प्रेमदिनी एकमेकांना फुले, भेटवस्तू, चॉकलेट वगैरे दिल्यानेच प्रेम सिद्ध होते असे नव्हे, तर यातले काहीही न करता एकमेकांना आयुष्यभराची साथ देणारी अनेक जोडपी शहरात आहेत. त्यांच्या मते प्रत्येक दिवसच 'व्हॅलेंटाइन डे' असतो. या जोडप्यांशी बोलताना त्यांच्यातील खऱ्या प्रेमाची प्रचीती आली. उतारवयात 'ते' बनले एकमेकांचा आधार उतारवयात अनेक आई-वडिलांच्या वाट्याला एकाकीपणा येतो. दोनवेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागतो. पुढील आयुष्याचा खडतर प्रवास कसा पूर्ण करायचा, असा यक्षप्रश्न डोळ्यांसमोर असतो. मात्र, अशा परिस्थितीतसुद्धा एकमेकांचा हात हातात घेऊन अनेक जोडपी आपल्या संसाराचा गाडा पुढे ओढत असतात. तांडापेठ येथील 'पोहेवालं जोडपं' अशी ओळख असलेल्या जुनघरे दाम्पत्याची अशीच प्रेरणादायी कहाणी आहे. तांडापेठ येथील पंडित नेहरू कॉन्व्हेंटजवळ टेबल आणि खुर्चीवर हे दाम्पत्य आपले चना-पोह्याचं दुकान लावतात. भास्कर आणि त्यांची पत्नी सुमित्रा जुनघरे, असे या जोडप्याचे नाव आहे. वयाच्या ७०व्या वर्षी हे दोघे स्वकष्टाच्या बळावर आयुष्यातील संघर्षाशी दोन हात करीत आहेत. जुनघरे दाम्पत्याला पाच मुली आहेत. त्या लग्न होऊन आपापल्या घरी गेल्या. त्यानंतर उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. परिस्थितीपुढे न डगमगता घराजवळच तर्री-पोह्याचा ठेला लावत यांनी आपल्या प्रवास सुरू केला. महागाईच्या काळात अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुली संसारात व्यस्त असून आम्हीच एकमेकांचा आधार आहोत, असे भास्कर जुनघरे सांगतात. मधल्या काळात परिस्थिती पाहून काही युट्युबर्सनी व्हिडीओ बनविला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ग्राहकांचा ओढा वाढला; मात्र, नंतर पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली. येत्या काळात पतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत पुढचा प्रवास भक्कमपणे करू, अशा विश्वास सुमित्रा यांनी व्यक्त केला. फिल्मी कपलची 'चटोरी' स्टोरी 'मियां बीबी का हाथ, कटोरी चाट...' म्हणत एका फिल्मी कपलची स्टोरीही अशीच प्रेरणादायी. ३६ वर्षीय यतीश पराते आणि ३३ वर्षीय रोशनी पराते, असे या जोडप्याचे नाव. गांधीबागमधील नंगा पुतला चौक जवळ त्यांचा चाटचा ठेला आहे. नवरा-बायकोच्या या जोडीने एकमेकांच्या सहाय्याने आज देशभर ख्याती प्राप्त केली आहे. आपल्या हटके फिल्मी स्टाइलने विविध प्रकारच्या चाटची ते विक्री करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांमध्ये त्यांची विशेष क्रेझ आहे. यतीश आणि रोशनी यांचा विवाह २०१३ साली झाला. २०१५ साली त्यांनी या चाट सेंटरची सुरुवात केली. सुरुवातीला अनेक आव्हानांचा त्यांना सामना करावा लागला. २०१६मध्ये रोशनी या गर्भवती असताना देखील पतीला ठेल्यावर साथ देणे सुरू ठेवले. सर्व पदार्थ रोशनी या स्वत: घरीच तयार करतात. या कामात त्यांच्या 'सौ'ची मदत नसती तर त्यांना कदाचित नवी ओळख मिळाली नसती, असे यतीश सांगतात. आपल्या जोडीदाराला साथ देऊन खऱ्या अर्थाने प्रेम व्यक्त करता येते, असे ते म्हणतात. स्टार्टअपच्या माध्यमातून प्रेम 'स्टार्ट' स्टार्टअपच्या माध्यमातून प्रेमाची सुरुवात झाल्याची अनोखी कहाणी शहरातील नुपूर आणि नहुश या जोडप्याची आहे. बिझनेस पार्टनर ते लाइफ पार्टनर असा प्रेरणादायी प्रवास त्यांनी केला आहे. साउंडबिट्ज आणि फिट्जबिट्ज या स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांनी एकमेकांना सहाय्य केले आणि आज ते दोघेही शहरातील प्रसिद्ध एंटरप्रेनर बनण्याच्या मार्गावर आहेत. नुपूर आणि नहुशची ओळख झाली तेव्हा दोघांकडे काहीच नव्हते. एकमेकांवरील विश्वास, धैर्य यांच्या बळावर त्यांनी स्टार्टअप करण्याचे ठरविले. नहुशची स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची आधीपासून इच्छा होती. नुपूरनेसुद्धा आपल्या जोडीदारावर विश्वास दाखवत फिट्जबिट्ज या स्टार्टअपला सुरुवात केली. 'माझे तुझ्यावर प्रेम आहे' असे फक्त म्हणून उपयोगाचे नाही. ते कृतीत दिसले पाहिजे, असे नुपूर म्हणते. नहूशच्या मते, 'प्रेम म्हणजे एकमेकांना गिफ्ट्स देऊन आनंदी करणे नव्हे, तर आपल्या जोडीदाराला प्रत्येक स्थितीत साथ देणे हे खरे प्रेम आहे.'


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: