चोरी करायला गेला आणि ४ वर्षाच्या मुलीवर केला लैंगिक अत्याचार; नराधमाला न्यायालयाने सुनावली शिक्षा!

February 16, 2022 0 Comments

: चोरीच्या उद्देशाने शेडमध्ये घुसून तेथे झोपलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला उचलून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. याप्रकरणी आता राणासिंग प्रकाशसिंग जुन्नी (वय-२२, रा.जळगाव ) या नराधमाला जळगाव जिल्हा न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून ७५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसंच दंडातील ७० हजार रुपये हे पीडितेला देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहे. न्या. एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला आहे. () जळगाव शहरातील एका भागात आपल्या पालकांसह चिमुकली शेडमध्ये वास्तव्याला होती. १७ ऑक्टोबर २०१८ रोजी मध्यरात्री शेडमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपी राणासिंग जुन्नी याने घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याने शेडच्या दरवाजाची आतील कडी हाताने उघडून शेडमधील मोबाईल चोरले. तसंच याठिकाणी झोपलेली ४ वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेत, एका निर्जण ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन १८ ऑक्टोंबर २०१८ रोजी तालुका पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयित राणासिंग जुन्नी याला त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. जिल्हा न्यायालयाचे न्या. एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात सरकारपक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेसह तिचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अंमलदार, डॉक्टर यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. मंगळवारी या खटल्याच्या निकालावर कामकाज झाले. न्या. ठुबे यांनी आरोपी राणासिंग जुन्नी याला दोषी ठरवत भादवि कलम ४६१,३८० आणि बाललैंगिक अधिनियम २०१२ चे कलम ४ ब नुसार दोषी धरुन नराधामास २० वर्ष सश्रम कारावास व ७५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास अडीच वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसंच भादंवि कलम ४६१ साठी १ वर्षाची साधी शिक्षा व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने साधी कारवासाची शिक्षा, भादंवि कलम ३८० नुसार ३ वर्षाची साधी शिक्षा व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: