फडणवीसांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं; मुख्यमंत्र्यांना टोला लगावत म्हणाले...

February 22, 2022 0 Comments

नाशिक : राज्यात व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडत असतानाच नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी शिवसेनेला पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचलं आहे. नाशिक महानगरपालिकेवर भाजपचा भगवा फडकवा, असं आवाहन करताना फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भगव्याची जबाबदारी आता फक्त भाजपवर आहे. बाकीचे काय करत आहेत हे तुम्ही पाहात आहात, असं म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. () 'महाराष्ट्रात कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नाही. सरकारचे अस्तित्व नाही. राज्य दलाली खाण्यासाठी नसते, ते मुंबईच्या बाहेर देखील असते, हे यांना माहीत नाही,' अशी जोरदार टोलेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी नाशकमध्ये शिवसेनेचे नाव न घेता केली. फडणवीस सोमवारी नाशिक दौऱ्यावर होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावाही झाला. कार्यकर्त्यांचा उत्साह बघता नाशिक महापालिकेवर पुन्हा भाजपचा भगवा फडकेल, असं सांगत फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांबद्दल काय म्हणाले फडणवीस? छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आता भाजपावर आहे. काही लोक भगवा घेऊन मिरवत आहे. मात्र, सत्तेसाठी ते कोणासोबतही जात आहे हे सर्वजण बघत असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. राज्यातील महाविकास सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, राज्यात कोण राज्य करत आहे हे कळतच नाही. सरकार अस्तित्वात आहे हेच दिसत नाही. मुंबईच्या बाहेरही महाराष्ट्र आहे याची कल्पनाच काहींना नसल्याचा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. दरम्यान, या मेळाव्याला माजी मंत्री जयकुमार रावल, उत्तर महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्णी, धुळे महापौर नाना कर्पे आदी उपस्थित होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: