coronavirus update: चिंता वाढली; करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ४८ हजारांवर, ५२ मृत्युमुखी

January 22, 2022 0 Comments

मुंबई: राज्यात करोनाची (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असून आज दिवसभरात करोनाचे ४८ हजारांवर नवे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासात ४८ हजार २७० नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज राज्यात एकूण ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ४२ हजार ३९१ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरत राज्यात आज एकूण २ लाख ६४ हजार ३८८ रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत. (maharashtra registered 48270 new cases in a day with 42391 patients recovered and 52 deaths today) राज्यात आजपर्यंत एकूण ७० लाख ०९ हजार ८२३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४७ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी २९ लाख ५१ हजार २८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७४ लाख २० हजार ०२७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १०.१७ टक्के इतके आहे. सध्या राज्यात २३ लाख ८७ हजार ५९३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ३ हजार ३५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. क्लिक करा आणि वाचा- याबरोबरच, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार ०२३ इतकी आहे. मुंबईत आज ५ हजार ००८ नवे रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आज गुरुवारी ५ हजार ००८ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईतील करोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या १० लाख २७ हजार ७९७ इतकी झाली आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये १२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर, आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजार ५१२ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- ठाणे जिल्ह्यात आज एकूण ३ हजार ३३८ नवे रुग्ण ठाणे जिल्ह्यात आज शुक्रवारी ३ हजार ३३८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ठाण्यात ३७७, ठाणे महापालिका क्षेत्रात ९२०, नवी मुंबई मनपा क्षेत्रात १ हजार २३८, कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात ४२५, तर उल्हासनगर मनपा क्षेत्रात १०१, भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रात ५१, मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रात २२६ रुग्ण आढळले आहेत. क्लिक करा आणि वाचा- तर, पालघरमध्ये आज २७२ रुग्ण आढळले असून, वसई विरार मनपा क्षेत्रात २१९, रायगडमध्ये ८६६ आणि पनवेल मनपा क्षेत्रात ७९० नवे रुग्ण आढळले आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: