इंदुरीकर महाराज पुन्हा वादात; तृप्ती देसाई यांनी केला 'हा' आरोप

January 14, 2022 0 Comments

विजयसिंह होलम । अहमदनगर समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी पुत्रप्राप्तीसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण अद्याप न्यायालयात सुरू आहे. अशातच आता त्यांच्या करोनाबंधीच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. ‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांनी कीर्तनातून करून अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या यांनी केला आहे. याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही देसाई यांनी केली आहे. वाचा: यासंबंधी देसाई यांनी म्हटले आहे, ‘करोना ही महाभयंकर महामारी आहे. सध्या तिसरी लाट येत आहे. याआधी अनेक जणांना करोनामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. तर अनेक जण मृत्यूच्या दारातून बाहेर आले आहेत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच सरकार सुद्धा जनजागृती करत आहेच, परंतु स्वतःला कीर्तनकार म्हणविणारे इंदुरीकर पुन्हा एकदा असे वक्तव्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. ‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे सांगून कीर्तनाच्या माध्यमातून इंदुरीकर अंधश्रद्धा पसरवत आहेत,’ असा आरोप देसाई यांनी केला आहे. यासंबंधी इंदुरीकरांवर कारवाई करा, अन्यथा अंधश्रद्धा पसरविण्यात सरकारचे प्रतिनिधीसुद्धा सामील आहेत असे जनतेला वाटेल, असे सांगून देसाई यांनी म्हटले आहे, ‘सरकारमधील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना इंदुरीकर यांना बोलविले जाते. तेथे गर्दी जमा होते. आता लवकरच निवडणुका आहेत. म्हणूनच दरवेळी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांकडून केला जातो. यापूर्वीसुद्धा इंदुरीकर यांच्या करोनावरील वक्तव्यावर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. हिंमत असेल तर आणि आपल्या राज्यात सर्वांना कायदा समान असेल तर सरकारने इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करावा. अन्यथा अंधश्रद्धा पसरवण्यात सरकारसुद्धा सामील आहे असे जनतेला वाटेल,’ असेही देसाई यांनी म्हटले आहे. वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: