शाळांबाबत काय आणि कधी निर्णय होणार?, राजेश टोपे यांनी पूर्ण प्लॅन सांगितला!

January 18, 2022 0 Comments

जालना : राज्यातल्या शाळांबाबत बुधवारच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री यांनी दिलीये. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. जिथे कोरोनाचे रुग्ण नाहीत त्याठिकाणी सुरु कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याच विषयावर खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही शाळा सुरु करण्याची विनंती केली आहे. त्यावर बोलताना सुप्रियाताईंच्या मागणीचा विचार करु, असंही ते म्हणाले. शाळा सुरु करण्याबाबत येत्या बुधवारच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असून स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्याचा विचार आहे, असं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं. तसंच अनेक पालकही शाळा सुरु करण्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे जिथे कोरोनाच्या कमी केसेस आहेत, तिथे प्रामुख्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय होणार असल्याचे संकेत मंत्री टोपे यांनी दिले. यासोबतच लसीकरण हे सक्तीचं नसून ऐश्चिक आहे. मात्र संपूर्ण राज्याचं लसीकरण करुन घेण्याची तयारी सरकारची आहे. त्यामुळं लसीकरणाच्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, लसीकरण करून घ्या असं आवाहन टोपे यांनी केलंय. राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना आणि ओमायक्रॉनची संख्या वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या नगण्य असताना शाळा बंद करणे, विद्यार्थ्यांचं अगोदरच मोठं शैक्षणिक नुकसान झालेलं असताना शाळेला टाळं लावणं योग्य नसल्याचं मत अनेक पालक व्यक्त करत आहेत. त्यानंतर आता राज्य सरकारने एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: