सासूसोबत वाद झाला; वर्षभराच्या चिमुकल्याला आईनेच पाजले विष

January 16, 2022 0 Comments

बनपुरीतील थरार; स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न म.टा. प्रतिनिधी, नागपूरः सासूसोबत झालेल्या वादातून महिलेने एकवर्षीय चिमुकल्या मुलाचा विष पाजून खून केला. त्यानंतर स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना रामटेकपासून १५ कि.मी. अंतरावरील बनपुरी येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वेदांत रामकृष्ण घावडे (वय एक वर्ष) असे मृतकाचे तर प्रणाली घावडे असे त्या आईचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकृष्ण घावडे हे शेती करतात. तीन वर्षांपूर्वी त्यांचे प्रणालीसोबत लग्न झाले. शुक्रवारी दुपारी प्रणालीचा सासूसोबत वाद झाला. वाद विकोपाला गेला. यातून प्रणालीने सासूला आत्महत्येची धमकी दिली. सायंकाळी वेदांत घरात खेळत होता. प्रणालीने त्याला उचलून जवळ घेतले व विष पाजले. त्यानंतर थोडाच वेळात स्वत:ही विष प्यायले. नातेवाइकांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी धावाधाव केली. दोघांचीही प्रकृती खालावली होती. नातेवाइकांनी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून वेदांत याला मृत घोषित केले. वाचाः प्रणालीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर ताफ्यासह बनपुरी येथे पोहोचले. पंचनामा करून प्रणालीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अद्याप तिला अटक करण्यात आलेली नाही. एकुलत्या एक मुलाचा आईनेच खून केल्याने गावात खळबळ उडाली आहे. या घटनेने घावडे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: