पालकांची चिंता वाढली! या जिल्ह्यात लहान मुलांभोवतीही करोनाचा विळखा होतोय घट्ट

January 16, 2022 0 Comments

औरंगाबादः तिसऱ्या लाटेत लहान मुलं अधिक बाधित होतील अशी चिंता अनेकदा अभ्यासकांनी बोलवून दाखवली आहे. त्यातच आता मोठ्या व्यक्तींसोबत लहान मुलांभोवतीही करोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. एकट्या औरंगाबाद शहरात मागील दोन दिवसांत शहरात ६५ मुले कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यामुळे महापालिकेकडून लवकरच लहान मुलांचे स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्याच्या हालचाली होण्याची शक्यता आहे. (Aurangabad coronavirus) औरंगाबाद शहरातील दोन दिवसांची आकडेवारी पालकांची चिंता वाढवणारी आहे. शुक्रवारी शहरात ४०१ नवीन रुग्णांची भर पडली. त्यात ० ते १८ वयोगटातील ३४ जणांचा समावेश होता. तर ० ते १४ वयोगटातील १३ जणांचा समावेश होता. शनिवारी शहरात ४२३ रुग्ण आढळुन आले. त्यात ० ते १८ वयोगटातील ३१ जणांचा समावेश होता. व ० ते १४ वयोगटातील १६ जणांचा समावेश होता. वाचाः विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वी करोनाची तिसरी लाट लहान मुलांमध्ये येईल. तज्ज्ञाच्या या अंदाजामुळे गरवारे येथे बाल कोविड रुग्णालय उभारले होते. या ठिकाणी १२५ खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, ऑक्सिजन टँक सुद्धा बसविलेला आहे. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्येत लहान मुलांची भर पडत असल्याने महानगरपालिकेकडून बाल कोविड रुग्णालय सुरू करण्याची शक्यता आहे. वाचाः शनिवारी ५४० रुग्णांची भर.... माहिती कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी एकूण ५४० रुग्ण सापडले आहेत. ज्यात मनपा हद्दीत ४२३ रुग्ण तर ग्रामीण भागात ११७ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच शनिवारी १४७ रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून १०६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: