शिक्षकांना सलाम! सामाजिक संदेश देण्यासाठी केला औरंगाबाद ते दिल्लीपर्यंत सायकल प्रवास

January 10, 2022 0 Comments

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील तीन सायकलपटू शिक्षकांनी सायकल सदभावना यात्रेद्वारे २२१९ किलोमीटरचा प्रवास केला. मुख्याध्यापक विजय पाटोदी, कला शिक्षक विजयकुमार गोसावी, पियुष सेठी या तिघांचा यामध्ये समावेश आहे. १६ डिसेंबर ते दोन जानेवारी या दरम्यान प्रवास करून हे सायकलपटू शहरात परतले. पंधरा दिवसांच्या सायकल प्रवासात पर्यावरण संतुलन, इंधन बचत, मातृभाषेतून शिक्षण आदींबाबत महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश देण्यात आला. त्यांना राज्यातील इतर भागातील सायकलपटूंचीही साथ मिळाली. यात्रेत औरंगाबाद ते मुंबई आणि मुंबई ते दिल्ली असा २२१९ किलोमीटरचा सायकल प्रवास केला. सायकल यात्रेचा समारोप दिल्ली येथील इंडिया गेट परिसरातील अमर जवान ज्योती येथे झाला. यात्रेची सुरुवात १६ डिसेंबर रोजी विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील नगर नाका परिसरातील शहीद स्मारकाला वंदन करून करण्यात आली. औरंगाबाद मार्गे कोपरगाव, सिन्नर येथील गोंदेश्वर महादेव मंदिर , पुढे इगतपुरी, कसारा, भिवंडी , कल्याण, ठाणे, मुंबईत प्रवेश केला. १९ डिसेंबरला मुंबई गेट वे ऑफ इंडिया ते इंडिया गेट अमर ज्योती जवान दिल्ली पर्यंतचा १८५० किलोमीटरचा दुसरा टप्पा सुरू केला. दोन जानेवारी रोजी हरियाणातील रेवाडी गुरुग्राम पूर्ण करीत दिल्ली येथील अमर जवान ज्योती म्हणजेच इंडिया गेटला सकाळी ११ वाजता सर्व जण पोहोचले. सामाजिक संदेश सायकल पटूंनी या वेळी विविध गावांना भेट देऊन शिक्षक, विद्यार्थी, नागरिकांना सामाजिक संदेश दिला. पर्यावरण संतुलन, इंधन बचत, शारीरिक फिटनेस, शाकाहार, अहिंसा, सामाजिक सदभावना, व्यसनमुक्ती, बेटी बचाओ -बेटी पढाओ, मातृभाषेतून शिक्षण आदींबाबत सामाजिक संदेश दिला. पश्चिम महाराष्ट्रातील अन्य ४० सायकल पटूंनीही यात सहभाग नोंदविला. एकीकडे समुद्र किनारा होता, तर दुसरीकडे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. दरम्यान , सह्याद्री आणि अरवली पर्वत रांगाचे कणखर शिलाखंड होते. एका दिवसात साधारण पणे १७० ते २०० किलोमीटर प्रवास केला. सर्वांनी सामाजिक संदेश-विषय वाटून घेतलेले होते. मोठ्या संख्येने विविध वेशातील, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, संस्कृती जोपासणारे समूह आम्हाला भेटत गेले. - विजय. एस. पाटोदी, मुख्याध्यापक, पी. यू. जैन माध्यमिक विद्यालय, औरंगाबाद


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: