हटके स्टेटस असणाऱ्या टीशर्ट्सची कन्सेप्ट आणली bewakoof.com ने

January 09, 2022 , 0 Comments

बेवकूफ टीशर्ट ही कॅटेगरी जवळपास बऱ्याच भिडूंना माहिती असेलच….कॉलेजच्या पोरा-सोरांचा फेव्हरेट ब्रॅण्ड बनलाय तो म्हणजे बेवकूफ. जो दिसेल तो आजकाल बेवकूफच्या प्रिंटेन्ड टी-शर्ट मध्ये दिसतोय…..

तुम्हाला हा बेवकूफ ब्रॅण्ड माहिती नसेल तर ठीकेय सांगते… तुम्हाला रस्त्यावरून जातांना, किंव्हा कॉलेज, ऑफिस मधर कुणाच्याही अंगावर ब्रँडेड प्रिंटेन्ड टीशर्ट जर दिसला अन त्यावर असं काही तरी हटके लिहिलं असेल कि, “सब मोह माया हैं” “I Love वडापाव” “च्या साठी काय पण” “ओम फट्ट स्वाहा ” ‘चहाप्रेमी’ ‘संस्कारी’ “मुंबई, पाऊस, वडापाव आणि कटिंग चहा”, ‘घंटा इंजिनीअरिंग/घंटा एमबीए’, “2 मिनट आया यार रास्ते मे हूं”, 

असं भन्नाट अन कॅची कोट दिसलं कि समजायचं हे प्रिंटेड शर्ट्स बेवकूफ ब्रॅण्डचे आहेत. पण अडचण अशी कि आजकाल उठसुठ सगळेच प्रिंटेन्ड टीशर्ट काढायला लागलेत…

पण मुळात ही असं हटके स्टेट्स असणारी टीशर्ट्स ची कन्सेप्ट पहिल्यांदा कुणी आणली तर ते म्हणजे बेवकूफ ने…. ते अभिमानाने स्वत:ला बेवकूफ म्हणवतात कारण बेवकूफ ही अशी व्यक्ती आहे जी समाजाची पर्वा न करता काम करते.

थोडक्यात या ब्रॅण्ड ची सुरुवातच काहीशी इंटरेस्टिंग आहे, चला जाणून घेऊया हा हटके ब्रॅण्ड कुणाला आणि कसा सुचला…

प्रभकिरण सिंग आणि सिद्धार्थ मुनोत नावाच्या या 2 IITiansने यांनी 1 एप्रिल 2012 रोजी हा ब्रॅण्ड लाँच केला. त्यांना कळलं कि, जर कां लोकांना टीशर्ट विकायचे असतील तर कस्टमर्स साधा, प्लेन टीशर्ट का विकत घेतील? म्हणून त्यांनी टीशर्ट वर कोट्स लिहायला सुरुवात केली… ते कोट्स देखील असे असायचे कि, जे कुणालाही आपल्या आयुष्याशी निगडित वाटावेत. प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यासोबत रिलेट करू शकतो असे कोट्स लोकांना अपील होऊ लागले आणि मग काय… टी-शर्ट प्रिंट्समुळे त्यांची विक्री वाढू लागली. सुरुवातीला हे टीशर्ट इन्स्टा, फेसबुकवर विकली जात होती आता या कंपनीचे स्वतःचे अँप आहे.

प्रभकिरण आणि सिद्धार्थ मुनोत, Bewakoof.com चे सह-संस्थापक, त्यांचे हे बेवकूफ म्हणजे एक सुप्रसिद्ध ई-कॉमर्स स्टार्टअप आहे हे मात्र नक्की. आयआयटी बॉम्बेमधील या दोन सिव्हिल इंजिनीअरिंग पदवीधारकांना नेहमीच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. त्यांचा प्रवास सुरू झाला जेव्हा ते त्यांच्या कॉलेजच्या बाहेर बसून स्वतःचा व्यवसायाची सुरुवात केलेली. ग्रॅज्युएशननंतर, दोन्ही संस्थापकांनी स्वतंत्रपणे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. प्रभकिरणने त्याच्या कॉलेजच्या बाहेर खडके ग्लास हा लस्सी उपक्रम सुरू केला, जो चांगला चालला नाही आणि म्हणून शेवटी तो बंद करावा लागला होता.

दुसरीकडे, सिद्धार्थ एका शैक्षणिक स्टार्टअपसाठी काम करत होता. त्यानंतर त्यांनी स्वतःची टी-शर्ट प्रिंटिंग कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

कॉलेज स्टुडंट्सला मजा येईल असे अन हसायला लावेल असे काहीतरी तयार करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी त्यांच्या टी-शर्टसाठी कोट तयार करण्यापूर्वी सध्या तरुणांमध्ये काय ट्रेंड चालूये, लाईफस्टाईलचे देखील त्यांनी संशोधन केले. आणि, ट्रेंड नुसार अंदाजानुसार, त्यांच्या ब्रँडचे नाव, तसेच टी-शर्टवर छापलेल्या छान पण विनोदी कोट्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि तरुणांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला. 

2010 मध्ये प्रभकिरण सिंग आणि सिद्धार्थ मुनोत त्यांच्या कंपनीसाठी डोमेन नाव शोधत होते. काही असं भन्नाट असं सुचत नव्हतं… त्यांना काहीतरी मजेदार, हुशार आणि तरुणांना आकर्षक बनवायचे होते, त्याच दरम्यान झालं असं कि, एप्रिल महिना सुरू होणार होता सहाजिकच एप्रिल फूल डे जवळ आला होता. मग त्यांना बेवकूफ असं नावं सुचलं आणि त्यांनी ही कंपनी बेवकूफ नावाने सुरू केली. 

त्यांच्या या प्रोजेक्टला बेवकूफ म्हणण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल बोलताना, सिद्धार्थ म्हणतो कि, “आम्ही नशीबवान ठरलो. कारण आम्ही जेंव्हा लाईफस्टाईल ब्रॅण्ड लॉन्च करायचं ठरलं तेंव्हा ब्रँडचे नाव आणि डोमेन महत्त्वपूर्ण होते, आणि त्याचं नावं सुद्धा सहज सोपे आणि छोटेसे तसेच लक्षात ठेवण्यास सोपे असावे असं ठरले आहे. नंतर Bewakoof.com ही योग्य निवड होती. आमचा ब्रॅण्ड या सोप्या आणि काहीतरी वेगळ्या नावाने लोकांचे लक्ष वेधून घेईल आणि ते ग्राहकांच्या कायम लक्षात देखील राहील.”

खरं तर या Bewakoof.com ची सुरुवात 30,000 रुपयांच्या गुंतवणुकीने झाली होती आणि त्यांना सहा महिन्यांच्या ऑपरेशननंतर सीड फंडिंग मिळाले. त्यांनी स्नॅपडीलचे संस्थापक कुणाल बहल आणि रोहित बन्सल आणि माजी IDFC सिक्युरिटीजचे MD, निखिल व्होरा यांच्याकडून काही काळापूर्वी निधी देखील उभारला गेला होता.

सुरुवातीला बेवकूफ ने सावकाश पावलं टाकायला सुरुवातीला केलेली. बेवकूफची मार्केटिंग रणनीती आणि विपणन धोरण विचार करायला भाग पाडते.त्यांच्या उत्पादनांची विक्री आणि जाहिरात करण्यासाठी, कंपनीने सुरुवातीला दोन मुख्य प्लॅटफॉर्म वापरले, ते म्हणजे Justdial आणि Facebook. याचे परिणाम स्पष्ट होते, काही महिन्यांपेक्षा कमी काळात त्यांच्या Facebook पेजवर 75 हजारांहून अधिक युजर्स कंपनीशी जोडले गेले होते. काहीकाही अशाही ऑफर्स ठेवल्या गेल्या होत्या कि, कंपनीने दिलेल्या मोफत टीशर्टच्या बदल्यात त्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कॉलेज कॅम्पसमध्ये Beewakoofy पसरवणे अपेक्षित होते….अशी ही हलकी फुलकी मजेदार ऑफर होती.

कंपनीने आपली उत्पादने विकण्यासाठी Snapdeal, Indiatimes Shopping आणि Seventymm सारख्या अनेक सुप्रसिद्ध ई-कॉमर्स साइट्ससह भागीदारी करून त्यांचे मार्केटिंग देखील केले.

आजतगायत देखील विविध टी-शर्ट आणि प्रॉडक्ट्सवर छापलेले आकर्षक आणि ट्रेंडी कोट्स हे ब्रँडचे यश आहे हे मानावेच लागणारे कारण हे कोट्स लोकांचे लक्ष वेधून घेत असते. 

Bewakoof ची ऑनलाइन विक्री प्रचंड यशस्वी झाली आहे. 

बवकूफ आपल्या ग्राहकांशी झपाट्याने काम करून आपला व्यवसाय वाढवू शकलाय. लाईफस्टाईल आणि फॅशन ट्रेंडमधील संशोधनावर आधारित ते नवीन डिझाइन सादर करत असतात. बेवकूफचा 1.50 दशलक्षाहून अधिक लोकांचा सोशल मीडिया चाहता वर्गही नियमितपणे ऍक्टिव्ह असतो. सोशल मीडिया साइट्सवर बोर झाले कि, बरेच लोक त्यांच्या वेबसाइटला भेट देतात. फॅशन पण होते आणि चांगल्या क्वालिटीचे कपडेही मिळतात अन मग लोकं येथून शॉपिंग करूनच जातात.

बेवकूफची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या वेबसाइटला मासिक 2.5 दशलक्ष युजर्स भेटी देतात. या ब्रॅण्ड च्या शर्ट्सची 90 पेक्षा जास्त देशांमध्ये शिपिंग सुरू झाली आहे. फेसबुकवर ४०.१ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर 8700 हून अधिक सक्रिय फॉलोअर्स आहेत…..Instagram चे 2.39 दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोव्हर्स आहेत.

Bewakoof ने काही महिन्यांपूर्वी WhatsApp च्या माध्यमातून विक्री सुरू केली आणि त्यांनी त्यांच्या एकूण व्यवहारांपैकी 15% व्यवहार व्हाट्सअप द्वारे करतात आणि आता ते त्यांच्या एकूण विक्रीपैकी 15% इन्स्टंट मेसेंजरद्वारे कमावत असल्याचा दावा करतात. या  व्यतिरिक्त, हे स्टार्टअप Google जाहिराती आणि इतररी मार्केटिंग साधने यांसारखी सामान्य फंडे देखील वापरते….ऑफलाइन जाहिरातींमध्ये कॉलेज टाय-अप आणि कॉमिक कॉन, NH7, आणि मूड इंडिगो इ. सारख्या लोकप्रिय ग्रुप सोबत इव्हेंट देखील करत असतात.

पण तुम्हाला जर का हे बेवकूफचे शर्ट ऑर्डर करायचे असेल तर, त्या त्या आयटमचे नाव, तुमचे नाव आणि तुमचा पत्ता यासारखी माहिती त्यांच्या अधिकृत WhatsApp क्रमांकावर सबमिट करायची… झालं… तुमची ऑर्डर डन!

 

टीशर्ट्स सोडले तर आता या ब्रॅण्ड ने मोबाईल फोन कव्हर्स लाँच केले आणि त्यांची ही देखील आयडिया प्रचंड सक्सेसफुल ठरली. त्यांच्या या निर्णयाबद्दल बोलताना, सिद्धार्थ म्हणतो की ही एक मोठी संधी आहे आणि पुढील भविष्यातील लाईफस्टाईल मध्ये देखील आम्ही एन्ट्री मारू शकतो… आणि म्हणूनच त्याच कॉन्फिडन्सने आम्ही लाईफस्टाईलशी रिलेटेड अ‍ॅक्सेसरीज लाँच करण्याचा आमचा प्लॅन आहे. पण असं असलं तरी, मोबाइल ॲक्सेसरीजची वाढती मागणी पाहून मोबाइल कव्हर ही पहिली पसंती बनली आहे…

सिंग यांच्या म्हणण्यानुसार, कंपनी अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या कपडे आणि फोन केसेसपुरती मर्यादित असलेली उत्पादन श्रेणी वाढवण्याचा विचार करणार आहे. मागे असं सांगण्यात येत होतं कि, मुंबईत फ्लॅगशिप स्टोअरचे कामही सुरू आहे, जे 8 ते 9 महिन्यांत उघडू शकते असे संस्थापकांच म्हणणं आहे. Bewakoof कडे आज 150+ लोकांची टीम आहे.

तसेच या ब्रॅण्डसाठी मूव्ही मर्चेंडायझिंग हे टार्गेट करण्याचे आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे आणि त्यांनी सुरुवात केली टी म्हणजे, ‘गुंडे’, ‘बेवाकूफियां’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘बॉस’ आणि ‘शोले’ या हिंदी चित्रपटांसाठी कमर्शीअल पार्टनर म्हणून काम केले होते. “सोशल मीडियावरील आमची लोकप्रियता आम्हाला बॉलिवूडचा आवडता ब्रँड बनवत आहे. सर्व प्रमुख प्रॉडक्शन हाऊससाठी व्यापारासाठी आम्ही संपर्काचे पहिले ठिकाण आहोत. आम्ही आधीच यशराज, टी-सिरीज, वायकॉम18, एक्सेल एंटरटेनमेंट, झी टीव्ही इत्यादींसोबत त्यांचे खास अधिकृत व्यापारी भागीदार म्हणून पार्टनरशीप केली आहे,” असं प्रभाकिरण सांगतात.

सर्व आव्हाने आणि अडथळे असूनही, या दोन तरुण पदवीधरांनी अत्यंत जिद्द आणि कठोर परिश्रमाने त्यांची स्वप्ने पूर्ण केली….आणि सर्वांनाच आवडेल असा बेवकूफ ब्रॅण्ड डेव्हलप केलाय.

हे ही वाच भिडू

 

 

 

The post हटके स्टेटस असणाऱ्या टीशर्ट्सची कन्सेप्ट आणली bewakoof.com ने appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: