नाना पटोलेंच्या लेकीच्या लग्नात सत्ताधाऱ्यांपासून विरोधक झाडून हजर, पहा फोटो
नवी दिल्ली । काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या लेकीचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी अनेक राजकीय नेते उपस्थित होते. पुण्यात हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
विवाह सोहळ्याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील नेतेमंडळींनी हजेरी लावली. यामध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, धीरज देशमुख, श्रीनिवास पाटील, प्रज्ञा सातव यांनीही लग्नाला उपस्थिती लावली.
नाना पटोले यांनी या लग्नाचे निमंत्रण सर्वपक्षीय नेत्यांना दिले होते. यामुळे जवळपास सर्वच राजकीय पक्षांतील नेते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थि होते. हा विवाह सोहळा नाना पटोलेंचा गृहजिल्हा असलेल्या भंडारा किंवा नागपूर येथे होणार होता.
पण सध्या महाराष्ट्राची स्थिती फारशी चांगली नाही. अतिवृष्टी आणि त्यानंतर शेतकऱ्यांवर विविध संकटे आली आणि आत्ता आत्ता कोरोनाच्या तिसऱ्या व्हेरीअंटचा प्रकोप वाढणार असल्याची शक्यता लक्षात घेता नाना पटोलेंनी कमी पाहुण्यांमध्ये हा लग्न सोहळा घेण्याचा निर्णय घेतला.
राज्यात अनेक अडचणी असताना आपण या वादात पडायला नको, म्हणून शेतकरी नेते असलेल्या नानांनी कमीत कमी लोकांमध्ये लग्न सोहळा आटोपता घेण्याचा निर्णय घेतला असल्याचीही माहिती आहे. काही नेत्यांच्या लग्नातील गर्दीमुळे त्यांचावर जोरदार टीका झाली होती.
संजय राऊत, गुलाबराव पाटील यांच्यातील लग्नात नियम पाळले गेले नाहीत, यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली. यामुळे नाना पटोले यांनी मोठा बडेजाव न करता लग्न उरकून घेतले. तसेच ते पुण्यात आयोजित केले.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: