भाजपचे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्याविरोधात सुनेनेच केली तक्रार दाखल, केले ‘हे’ गंभीर आरोप

December 05, 2021 , 0 Comments

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर त्यांच्याच सुनेने प्रचंड गंभीर आरोप केले आहेत. एवढंच नव्हे तर पिचड कुटुंबीयांविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. माजी मंत्र्यांवर झालेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मधुकर पिचड महत्वाच्या पदांपासून दूर आहेत. अशावेळी आता पिचड यांच्याविरोधात त्यांच्या सुनेने गंभीर आरोप केले आहेत. मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पिचड यांच्यावर करण्यात आला आहे. पिचड यांच्या सुनेने आता पंचवटी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

कलम ४९८, ३०६, ४०६, ३२४, ५०४, ५०६, ४६८, ४७१ अन्वये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस मधुकर पिचड यांच्याविरोधात काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे तक्रारीनंतर पिचड यांच्या सुनेने मीडियाशी बोलताना अनेक गंभीर आरोप केले आहेत.

राजश्री किरण देशमुख (पिचड) यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर मीडियाशी बोलताना अनेक आरोप केले.
यावेळी त्या असं म्हणाल्या की, ‘मी २०१९ मध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता, पण तत्कालीन पोलीस यंत्रणेने साथ दिली नाही. फक्त महिला शाखेने अर्ज लिहून घेतला पण काहीही कारवाई झाली नाही. दरम्यान, तक्रार दिल्यानंतर माझ्यावर हल्ला करण्याची धमकीही देण्यात आली म्हणून मी पोलीस संरक्षण देखील मागितले आहे.

‘सुरुवातीला माझे पतीही मला त्रास द्यायचे. त्यामुळे त्या-त्या वेळी मी त्यांच्याविरोधात देखील पोलिसात तक्रार दाखल केल्या आहेत. आमच्या पती-पत्नी दरम्यान जेव्हा भांडण होत असे. तेव्हा घरातील मंडळी याबाबत माझ्या पतीला प्रोत्साहन देत असत.

‘मला घरात मोलकरणीसारखी वागणूक देत असत. मानसिक व शारीरिक छळ करीत असत. मला अपशब्द वापरून ते मानसिक छळ होत असे. २०१५ च्या दरम्यान घरातील मंडळींनी माझ्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त केलं. त्यानंतर पतीच्या मालकिची दीड कोटी रुपयांची बालाजी वेव्हरेजेस कंपनीचे बनावट कागदपत्र तयार करून व कंपनीच्या नावात बदल करून माझे सर्व हक्क संपवले. माझ्या पतीचे दागीने, पॅालिसी व ठेवी देखील काढून घेतल्या. असे अनेक गंभीर आरोप राजश्री पिचड यांनी केले आहेत.

दरम्यान, आता याबाबत मधुकर काशीनाथ देशमुख (पिचड), जगदीश किरण देशमुख (पिचड), कमलबाई मधुकरराव देशमुख, सौ.अश्विनी रणजीत दरेकर, रणजीत चंद्रकांत दरेकर यांच्या विरोधात ३० नोव्हेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी राजश्री पिचड यांनी असंही स्पष्ट केलं आहे की, याविषयी कोणताही राजकीय हेतू नाही. माझ्यावर झालेला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज मी आपल्यासमोर आली आहे. दोन वर्षापूर्वीही मी पोलिसात गेले होते पण मला तेव्हा पोलिसांकडून सहकार्य मिळालं नव्हतं. पण आता किमान एफआयआर तरी दाखल झाला आहे. असं त्या म्हणाल्या.
ताज्या बातम्या
१६ करोडमध्ये रिटेन होऊनही दु:खात आहे रोहित शर्मा, म्हणाला, ‘या’ गोष्टीने माझे ह्रदय पुर्णपणे तुटले
“ज्यांना काॅंग्रेसकडून आयुष्यभर सुख आणि सत्ता मिळाली तेच लोकं काॅंग्रेसची गळचेपी करताहेत”
मुख्यमंत्र्यांनी भाजप महिला आमदाराच्या प्रश्नाची उडवली खिल्ली; म्हणाले, तुम्ही दिसायला सुंदर आहात पण…
कामगाराने एका हाताने फेकले शेकडो किलोचं पोतं; लोकं म्हणाले, बजरंगाची कमाल, हमाल दे धमाल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: