कल्याण डोंबिवलीत चाललंय काय?; परदेशातून आलेल्या आणखी ६ जणांच्या रिपोर्टने वाढवली चिंता!
कल्याण : गेल्या काही दिवसात परदेशातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या प्रवाशांपैकी आणखी सहा जणांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या करोनाबाधितांची प्रकृती स्थिर असून या सर्व रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची करोना लक्षणे आहेत. त्यांना संस्थात्मक विलगीरणात ठेवण्यात आलं आहे. या रुग्णांना ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटची बाधा झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत. () ओमिक्रॉनच्या भीतीने शहरात लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांची पावले पुन्हा लसीकरण केंद्राकडे वळू लागली आहेत. २५ नोंहेबर ते २ डिसेंबर या कालावधीत नागरिकांचा लस घेण्यासाठी कल वाढला आहे. या सात दिवसात तब्बल ७७ हजार ५६६ नागरिकांनी करोनाची लस घेतली आहे. दक्षिण आफ्रिका, बेल्जियम, हॉंगकॉंग यांसारख्या काही देशात ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. डोंबिवलीतील तरुणाला ओमिक्रॉनची लागण राज्यात शनिवारी पहिल्या ओमिक्रॉनबाधित रुग्णाचं निदान झालं असून हा रुग्ण महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा करोनाचा नवा व्हेरियंट आढळल्याचं प्रयोगशाळा तपासणीतून स्पष्ट झालं आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा तरुण २४ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबईत आला होता. ओमिक्रॉन बाधित आढळलेल्या तरुणाने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला, मात्र इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: