कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक: लढून काही होणार नाही असं दिसताच भाजपनं...
गुरुबाळ माळी । जिल्ह्याची आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या बँकेवर संचालक होण्यासाठी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील तीन मंत्री, दोन खासदार आणि आठ आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येकालाच या बँकेवर बिनविरोध येण्याची इच्छा असल्याने पक्षाचा झेंडा बाजूला ठेवत गाठीभेटीचा धडाकाच लावला जात आहे. जिल्हा बँक ही त्या-त्या जिल्ह्याची आर्थिक नाडी समजली जाते. या बँकेवर संचालक झाल्यानंतर त्याचा राजकीय फायदा घेण्यास मोठी मदत होते. यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक होण्यासाठी सध्या जिल्ह्यातील नेते सक्रिय झाले आहेत. यामध्ये गृहराज्यमंत्री यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामविकास मंत्री , आमदार पी.एन. पाटील, , प्रकाश आवाडे, राजू आवळे, राजेश पाटील यांच्यासह काही आमदार बिनविरोध निवडीसाठी फिल्डींग लावत आहेत. त्यांच्यासह आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर हेदेखील संचालक होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वाचा: आमदार ऋतुराज पाटील वगळता सर्व तीन मंत्री आणि आठही आमदारांना जिल्हा बँकेचे संचालक व्हायचे आहे. खासदार प्रा. संजय मंडलिक यांनीही संचालक पदासाठी अर्ज भरला आहे. दुसरे खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने यांना महिला राखील गटातून संचालक व्हायचे आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे शहर व जिल्हाध्यक्ष, अनेक माजी आमदारांनाही बँकेत जाण्याची इच्छा आहे. यामुळे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सध्या राजकारणाला वेग आला आहे. वाचा: या बँकेवर सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. भाजप त्यांच्या विरोधात लढेल अशी शक्यता होती. पण, लढून हाती काही येणार नाही अशी शक्यता वाटल्याने भाजप आणि जनसुराज्यच्या नेत्यांनी समझोता एक्स्प्रेससाठी पुढाकार घेतला आहे. यातून विनय कोरे आणि प्रकाश आवाडे हे दोन आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत बैठका घेत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेवर संचालक होण्यासाठी मंत्री, खासदार, आमदारांमध्येच रस्सीखेच सुरू झाल्याने सामान्य कार्यकर्ते मात्र बँकेपासून दूरच राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या फळीतील अनेक नेते, कार्यकर्ते यांनी संचालक होण्यासाठी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना माघार घ्यावी लागण्याचीच चिन्हे आहेत. आम्हाला हवी जिल्हा बँक मंत्री... हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर खासदार... प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने(निवेदिता माने) आमदार... पी.एन. पाटील, विनय कोरे, प्रकाश आवाडे, राजूबाबा आवळे, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: