भारताबाहेर निघालेल्या जॅकलिनला विमानतळावरच रोखले, अटक होण्याची शक्यता

December 06, 2021 , 0 Comments

मुंबई । प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही दिवसांपासून वादात सापडली आहे. तिच्याविरोधात लूकआऊट नोटीस काढण्यात आली आहे. रविवारी यामुळेच जॅकलिनला मुंबई विमानतळावर रोखण्यात आले आहे. तिला अटक देखील होण्याची शक्यता यामुळे वर्तविण्यात आली आहे.

याबाबत सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ईडीने २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी ईडीने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी जॅकलिनचे देखील नाव समोर येत आहे. जॅकलिन दुबईला एका कार्यक्रमासाठी जात होती. यावेळी तिला अडवण्यात आले आहे.

सुकेश चंद्रशेखर याने तिहार जेलमध्ये असताना एका उद्योजकाच्या पत्नीकडून २०० कोटींची वसूली केल्याचा आरोप आहे. याबाबत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे आहेत.

तिला अनेक महागडे गिफ्ट देण्यात आल्याचे देखील माहिती समोर आली आहे. तसेच सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिनचे संबंध असल्याचे देखील समोर आले आहे. एका हॉटेलमध्ये ते सोबत राहिल्याचे त्यांचे फोटो देखील समोर आले आहेत. यामुळे ती वादात सापडली आहे.

जॅकलिनसोबतच या आरोपपत्रात अभिनेत्री नोरा फतेहीचा देखील समावेश आहे. सुकेशने नोराला खूप महागडी कार भेट म्हणून दिली होती. ईडीने यापूर्वीच दोन्ही अभिनेत्रींची चौकशी केली आहे. आता त्यांना अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता देखील जॅकलिनची चौकशी करण्यात आली आहे. तसेच दिल्लीमध्ये तपास यंत्रणेसमोर हजर राहावे लागेल असे सांगण्यात आले आहे. त्यांच्यात मोठे व्यवहार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: