गुगलवर सर्वाधिक शोधले गेले 'घरी ऑक्सिजन बनविण्याचे तंत्र', गुगलने जाहीर केली यादी

December 22, 2021 0 Comments

नागपूर : गुगलने २०२१मध्ये सर्वाधिक शोधल्या गेलेल्या विषयांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार करोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान 'घरच्या घरी ऑक्सिजन कसा बनवायचा' या विषयाचा सर्वाधिक नागरिकांनी गुगलवर शोध घेतला असल्याचे दिसून आले आहे. () करोना, क्रिप्टोकरन्सी आणि परीक्षांचे निकाल या तीन गोष्टींनी २०२१ हे वर्ष सर्वाधिक चर्चेत राहिले. गुगलने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या तीन विषयांशी संबंधित माहितीचा शोध गूगलवर सर्वाधिक नागरिकांनी घेतला. दरवर्षी, गुगल विविध श्रेणींमध्ये वर्षातील टॉप सर्च केलेल्या ट्रेंडची यादी प्रसिद्ध करते. त्यात बातम्या, क्रीडा, मनोरंजन आणि इतर श्रेणींमध्ये भारतीयांनी वर्षभरात सर्वाधिक काय शोधले याचा समावेश असतो. यावर्षी मुख्यतः करोना विषाणू आणि भारतात लसीसाठी नोंदणी कशी करावी, या विषयांवर भर होता. 'कोव्हिड लसीसाठी नोंदणी कशी करावी' हा शोधयादीतील सर्वात वरचा विषय होता. भारताने लसीकरण अभियान सुरू केल्यानंतर या लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी, याबाबत सर्वाधिक माहिती घेण्यात आल्याची माहितीही यामुळे पुढे आली आहे. 'लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे' हा दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक शोधला गेलेला विषय होता. यासह, क्रिप्टोकरन्सीशी संबंधित 'भारतात डॉजकॉइन कसे खरेदी करावे' आणि 'बिटकॉइनमध्ये गुंतवणूक कशी करावी' याबाबत भारतीयांनी सर्वाधिक माहिती जाणून घेतल्याचेही या 'सर्च'नुसार सिद्ध झाले आहे. (google top searches today in India) असे आहेत काही विषय - करोना लसीकरिता नोंदणी कशी करावी (How to register for corona vaccine) - लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे (How to download Vaccination Certificate) - ऑक्सिजन पातळी कशी वाढवावी (How to increase oxygen level) - आधार-पॅन लिंक कसे करावे (how to link Aadhar to pan) - घरी ऑक्सिजन कसा बनवायचा (How to make oxygen at home) - भारतात डॉजकॉइन कसे खरेदी करावे (How to buy Dodge coin in India) - बनाना ब्रेड कसा बनवायचा (How to make banana bread) - आयपीओ वाटपाची स्थिती कशी तपासायची (How to check the status of IPO allotment) - बिटकॉइनमध्ये गुंतवणूक कशी करावी (How to invest in Bitcoin) - गुणांची टक्केवारी कशी काढायची (How to calculate the percentage of points) (google top searches today in India)


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: