फक्त काँग्रेसचे ट्विट लाईक केल्यामुळे हेलिकॉप्टर अपघातात मृत शहीदाची १७ वर्षांची मुलगी ट्रोल

December 12, 2021 , 0 Comments

कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांमध्ये ब्रिगेडियर लखविंदर सिंग लिड्डर यांचाही समावेश होता, ज्यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे संरक्षण सहाय्यक म्हणून तीन सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी व्यापक काम केले होते. त्यांच्यावर दिल्लीतील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ब्रिगेडियर लिडर यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलीने बेरार स्क्वेअर, दिल्ली कॅंट येथे त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. ब्रिगेडियरच्या पत्नी गीतिका लिड्डर आपल्या पतीला अखेरचा निरोप देताना रडताना दिसल्या. त्यांना अशा स्थितीत पाहून प्रत्येकाच्याच डोळ्यात अश्रू तरंगत होते.

ब्रिगेडियर एलएस लिड्डर हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे संरक्षण सल्लागार होते. ब्रिगेडियर लिड्डर यांची लवकरच मेजर जनरल म्हणून पदोन्नती होणार होती. पण अचानक झालेल्या अपघातामुळे त्यांच्या कुटूंबावर मोठे संकट आले आहे. त्यांची मुलगी आशना लिड्डर हिच्या डोक्यावरुनही वडिलांचे छत्र हरपले आहे. त्यामुळे तिच्यावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर लिडरची मुलगी आशना लिड्डर म्हणाली, मी १७ वर्षांची होणार आहे. माझे वडील १७ वर्षे माझ्यासोबत राहिले. त्याच्या चांगल्या आठवणी आम्ही सोबत घेऊन जाऊ. हे राष्ट्रीय नुकसान आहे. माझे वडील माझे चांगले मित्र आणि माझे नायक होते. ते खुप चांगले होते, ते माझ्यासाठी नेहमीच मला प्रेरणा द्यायचे.

मात्र आशनाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. #AshanaLidder या नावाचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत होता. आशनाने काँग्रेस नेत्यांचे ट्विट लाईक केले होते. तसेच तिने वेळोवेळी आपली मते मांडली होती, त्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे ट्रोल झालेल्या आशनाने ट्विटर सोडले असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, आशना ही सध्या १७ वर्षांची असून ती बारावीमध्ये शिकत आहे. तिने एक पुस्तकदेखील लिहिले आहे. तिने प्रियांका गांधींचे ट्विट रिट्विट केले होते. तिला ट्रोल करण्यात आल्यानंतर शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी तिच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे.

दु:खी असूनही ती मुलगी धीर दाखवत आहे. नुकतेच तिच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. अशी १७ वर्षांची मुलगी फक्त तिच्या विचारांमुळे ट्रोल होत आहे. यामुळे तिला तिचं ट्विटर अकाऊंट हटवण्यास भाग पाडलं आणखी किती खाली जाणार आहात? असा सवाल प्रियांका चतुर्वेदींनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
मोहम्मद शामीला सपोर्ट केल्यामुळेच विराटचे कर्णधापद गेले; काॅंग्रेस मंत्र्याचा अजब तर्क
आता नवाब मलिक यांच्या घरी देखील पडणार छापा? स्वताच ट्विट करून दिली माहिती…
भाजप बदला घेणार? नवाब मलिकांच्या घरी ईडीची धाड पडणार? मलिकांचा खळबळजनक दावा


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: