आयपीएलचा नवा ऑक्शन ! ‘या’ पाच खेळाडूंवर पडू शकतो पैशांचा पाऊस

December 04, 2021 , 0 Comments

आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश झाल्यानंतर जानेवारीमध्ये मेगा लिलाव होणार आहे. जुन्या आठ संघांनीही कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यानंतरही लिलावात अनेक मोठी नावे आहेत आणि त्यांना मोठ्या बोली लागतील हे निश्चित. पण काही युवा खेळाडूंनीही आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले असून मेगा लिलावात त्यांच्यावर मोठी बोली लावली जाऊ शकते. यातील काही खेळाडूंनी यापूर्वी आयपीएल खेळले आहे, तर काहींनी देशांतर्गत स्पर्धेत आपल्या दमदार कामगिरीने छाप पाडली आहे.

आवेश खानने आयपीएल २०२१ मध्ये दिल्लीकडून खेळताना शानदार गोलंदाजी केली. या मोसमात सर्वाधिक बळी घेणारा तो दुसऱ्या क्रमांकावर होता. दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडा आणि नोर्टजे यांच्यासोबत खेळताना आवेशने दमदार छाप पाडली. त्याची भारतीय संघात निवडही झाली होती, मात्र आजपर्यंत त्याला टीम इंडियासाठी एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. आयपीएलच्या गेल्या मोसमात आवेशने १६ सामन्यात २४ विकेट घेतल्या होत्या. यादरम्यान त्यांची किंमत ७.३७ होती. मेगा लिलावात त्याला मोठी बोली लागण्याची खात्री आहे.

शाहरुख खान २०२१ च्या आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळला होता. त्याने काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरीही केली होती, परंतु आतापर्यंत तो त्याच्या क्षमतेनुसार कामगिरी करू शकला नाही. शाहरुखची देशांतर्गत सामन्यांमध्ये उत्तम फिनिशर अशी प्रतिमा आहे. त्याने अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. गेल्या मोसमापासून तो तामिळनाडूसाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी फायनलमध्ये खेळाला आहे. आयपीएलच्या ११ सामन्यांमध्ये त्याने २१.८६ च्या सरासरीने १५३ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १३४.२३ आहे. सर्व संघांना त्याच्या क्षमतेची जाणीव आहे आणि त्यावर मोठी बोली लागू शकते.

२०२१ च्या T२० विश्वचषक स्पर्धेत लेग स्पिन गोलंदाजांचे वर्चस्व होते आणि आयसीसी क्रमवारीतही तेच आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये लेग स्पिन गोलंदाज खूप महत्त्वाचे आहेत आणि राशिद खानपासून चहलपर्यंत त्याची उदाहरणे आहेत. रवी बिश्नोईनेही आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने २३ आयपीएल सामन्यांमध्ये २४ विकेट घेतल्या आहेत आणि त्याची किंमत ६.९७ कोटी इतकीच आहे. पंजाबकडून खेळणारा रवी हा आयपीएलमधील चहल आणि राहुल नंतर तिसरा सर्वोत्तम भारतीय लेगस्पिनर आहे. मेगा लिलावात अनेक संघ त्याला विकत घेऊ इच्छितात.

बंगळुरूचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतनेही या मोसमात आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. यानंतर त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्टँडबाय यष्टीरक्षक म्हणूनही छाप पाडली. आयपीएलच्या आठ सामन्यांत ३८.२ च्या सरासरीने १९१ धावा करणाऱ्या भरतवरही सर्वांच्या नजरा असतील. त्याचा स्ट्राइक रेट १२२.४४ आहे. त्याच्याकडे टॉप ऑर्डरमध्ये मोठी खेळी खेळण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच अनेक संघ त्याला आपल्या ताफ्यात समाविष्ट करू इच्छितात.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या अक्षय कर्णेवारवरही आयपीएलच्या सर्व संघांच्या नजरा असतील. विदर्भाचा फिरकी गोलंदाज अक्षय दोन्ही हातांनी गोलंदाजी करू शकतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने सलग चार ओव्हर मेडन्स टाकल्या होत्या. यानंतर पुढच्या सामन्यातही त्याने हॅटट्रिक घेतली. सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात त्याने चार षटकांत केवळ पाच धावा देऊन चार बळी घेतले होते. त्यामुळे त्यावरही मोठी बोली या मोसमात लागू शकते.

ताज्या बातम्या
 शेतकऱ्यांनी कंगणाला दाखवला हिसका; अभिनेत्री म्हणते त्यांनी मला मारूनच टाकलं असतं
लस घ्या आणि जिंका टीव्ही,फ्रिज अशा वस्तू ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सुरु आहे भन्नाट ऑफर
ओमिक्रॉनचा खेळ खल्लास! ‘या’ कंपनीने ओमिक्रॉनवर शोधले प्रभावी औषध
पेट्रोल डिझेलचे नवीन रेट जाहीर, ‘या’ शहरात मिळत आहे ८२ रु लिटरने पेट्रोल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: